AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याची उसळी, चांदी पण महागली, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसली

Gold Silver Rate Today 29 March 2024 | सोने गेल्या दोन दिवसांपासून चमकत आहे. तर नरमाईचे धोरण सोडून चांदी पण वधारली आहे. चांदीत सलग दोन दिवस घसरण सुरु होती. सोन्यातील दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. सोने जवळपास 600 रुपयांनी महागले आहे.

सोन्याची उसळी, चांदी पण महागली, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसली
सोने वधारले तर चांदी पण चमकली
| Updated on: Mar 29, 2024 | 8:38 AM
Share

मार्च महिन्यात सोने आणि चांदीने कहर केला आहे. महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसांत दोन्ही धातूंनी आघाडी उघडली होती. त्यानंतर थोडा ब्रेक घेत दोन्ही धातू पुन्हा चमकले. गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी तर चांदी 2800 रुपयांनी महागली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी आणि मंगळवारी किंमतीत काही बदल दिसला नाही. त्यानंतर सोने महागले. गेल्या दोन दिवसांत सोने 600 रुपयांनी वधारले. तर चांदीने पण नरमाईचे धोरण सोडत चढाई केली. सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today 29 March 2024) असा आहे भाव?

सोने चमकले

या आठवड्यात 26 मार्च रोजी सोने 100 रुपयांनी घसरले. 27 मार्च रोजी 200 रुपयांची दरवाढ झाली. 28 मार्च रोजी सोने 350 रुपयांनी महागले. दोन दिवसांत सोने 600 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 61,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 67,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी उसळली

गेल्या आठवड्यात 21 मार्च रोजी चांदी 1500 रुपयांनी वधारली होती. चांदीचा भाव कमी जास्त झाला. 22 मार्च रोजी चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली होती. 25 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी 26 मार्च रोजी किंमती तितक्याच कमी झाल्या. 27 मार्च रोजी 300 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने दरवाढीची सलामी दिली. 24 कॅरेट सोने 67,252 रुपये, 23 कॅरेट 66,983 रुपये, 22 कॅरेट सोने 61,603 रुपये झाले.18 कॅरेट 50439 रुपये, 14 कॅरेट सोने 39,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,127 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

Follow Us
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...