AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : चांदीचे कमबॅक, सोन्याचे लोळण, भाव तरी काय

Gold Silver Rate Today : सोन्याचा लवकरच दारुण पराभव होणार का, अशी एक चर्चा होत आहे. म्हणजे सोन्याने आतापर्यंत दरवाढीचे रेकॉर्ड केले आहेत. आता घसरणीचा रेकॉर्ड होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चांदी मात्र चमक दाखवेल, असा अंदाज आहे. सणासुदीत सोन्याची घसरण कोणाला नकोय नाही का?

Gold Silver Rate Today : चांदीचे कमबॅक, सोन्याचे लोळण, भाव तरी काय
Image Credit source: Google
| Updated on: Sep 30, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : तर सोन्याचे मोठे पानिपत होणार असल्याचा अंदाज बाजारातील दिग्गज वर्तवित आहे. बाजारात पण याविषयीची चर्चा रंगली आहे. गेल्या दहा वर्षांत सोने आणि चांदीने अनपेक्षित भरारी घेतली. दोन्ही धातू झटपट दुप्पट झाले. यापूर्वी चटकन ही बाब कधी लक्षात आली नव्हती. त्यामुळे या दरवाढीकडे अद्यापही लोक साशंकतेनेच पाहतात. जागतिक बाजारात सोने-चांदी दबावाखाली आहेत. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारातही दिसून येत आहे. डॉलरची घसरण थांबविण्यासाठी अमेरिकेने कंबर कसली आहे. तर कच्चा तेलाविषयी रशिया आणि सौदी अरेबिया यांची धोरण जगाची डोकेदुखी वाढवत आहे. त्याचा थेट परिणाम सोने-चांदीवर (Gold Silver Price Today 30 September 2023) होत आहे. सोने इतके स्वस्त झाले आहे तर चांदीने उसळी घेतली आहे.

सोने आपटले

गुडरिटर्न्सनुसार, एकूणच सप्टेंबर महिना सोन्यासाठी अनलकीच ठरला. मध्यंतरीचे पाच दिवस वगळता सोन्याला अपेक्षित दरवाढ पण गाठता आली नाही. 15 ते 19 सप्टेंबर या काळातच सलग तेजी दिसून आली. सोने 700 रुपयांनी वधारले. इतर वेळी सोन्यात पडझडीचे सत्र दिसले. आता सोने मोठी आपटी खाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 26 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 27 सप्टेंबर रोजी 250 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 28 सप्टेंबर रोजी सोन्याने 650 रुपयांची आपटी खाल्ली. 29 सप्टेंबर रोजी सोने 250 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट सोने 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,680 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

चांदीचे कमबॅक

चांदीला सप्टेंबर महिन्यात मोठी मजल मारता आलेली नाही. सुरुवातीच्या सत्रात चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. 22 तारखेला 1 हजारांनी किंमती वधारल्या. 23 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 26 सप्टेंबर रोजी 1000 रुपयांनी भाव घसरला. 27 सप्टेंबर रोजी 600 तर 28 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी चांदी घसरली. 29 सप्टेंबर रोजी चांदीने रिव्हर्स गिअर टाकला. भाव हजार रुपयांनी वाढला. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट असा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 57,719 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 57,488 रुपये, 22 कॅरेट सोने 52,871 रुपये, 18 कॅरेट 43,289 रुपये, 14 कॅरेट सोने 33,766 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,603 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...