Gold Silver Rate Today 4 April 2024 : सोन्याने केला कहर; चांदीचा भिडला गगनाला दर, इतकी झाली दरवाढ

| Updated on: Apr 04, 2024 | 8:35 AM

Gold Silver Rate Today 4 April 2024 : मार्च महिन्यानंतर सोने आणि चांदीने एका दमात लांब उडी घेतली. मार्च महिन्यात सोन्याने यापूर्वीचे रेकॉर्ड इतिहास जमा केले होते. तर चांदीने पण घौडदौड सुरु ठेवली होती. एप्रिल महिन्यात पण मौल्यवान धातू महागाईच्या वारुवर स्वार आहेत.

Gold Silver Rate Today 4 April 2024 : सोन्याने केला कहर; चांदीचा भिडला गगनाला दर, इतकी झाली दरवाढ
सोन्याचा टॉप गिअर, चांदी पण सूसाट
Follow us on

ग्राहकांना मौल्यवान धातूंनी मोठा झटका दिला. मार्चनंतर एप्रिल महिन्यातही सोने आणि चांदीने टॉप गिअर टाकला. 21 आणि 29 मार्च रोजी सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली होती. गेल्या महिन्यात दरवाढीचा नवनवीन रेकॉर्ड केला होता. एप्रिल महिन्यातही ही कमाल सुरुच आहे. गेल्या चार दिवसांत सोने 1600 रुपयांनी वधारले तर चांदीने चार दिवसांत 3 हजारांची झेप घेतली. या दमदार कामगिरीच्या बळावर सोने 70 हजारी मनसबदार ठरले आहे. तर चांदीने 80 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मौल्यवान धातूंनी पुन्हा नवीन रेकॉर्ड नावे केला आहे. काय आहे सोने आणि चांदीतील अपडेट (Gold Silver Price Today 4 April 2024)

सोने 750 रुपयांनी वधारले

मार्च महिन्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याने महागाईची गुढी उभारली होती. 2000 रुपयांनी भाव वधारले होते. 21 मार्च नंतर सोन्याने 29 मार्च रोजी उसळी घेतली. अनुक्रमे 1,000 रुपयांची आणि 1300 रुपयांची विक्रमी उडी घेतली होती. या 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी महागले. 2 एप्रिल रोजी 250 रुपयांनी किंमती कमी झाल्या. तर 3 एप्रिलला सोने 750 रुपयांनी उसळले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 3 हजारांनी वधारली

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात चांदी 1100 रुपयांनी महागली होती. या 1 एप्रिलला 600 रुपयांची दरवाढ झाली. 2 एप्रिलला पुन्हा 400 रुपयांची भर पडली. तर 3 एप्रिल रोजी चांदीने 2 हजारांची जोरदार मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 81,000 रुपये मोजावे लागणार आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली.24 कॅरेट सोने 69,364 रुपये, 23 कॅरेट 69,086 रुपये, 22 कॅरेट सोने 63,537 रुपये झाले.18 कॅरेट 52,023 रुपये, 14 कॅरेट सोने 40,578 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 77,594 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

चांदी गाठणार लांबचा पल्ला

एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये कमोडिटी करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी यावर प्रकाश टाकला. त्यांच्यानुसार, चीनमध्ये उत्पादन आणि औद्योगिक गतिशीलता वाढली आहे. तिथे चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळेच चांदीचे दर वाढल्याचे दिसून येते. त्यांच्या दाव्यानुसार येत्या दिवाळीपर्यंत चांदीचा भाव 81,0000 ते 82,000 रुपयांपर्यंत तर सोने 71 ते 72 हजार रुपयांच्या घरात पोहचू शकते.