ही आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला; संपत्ती मोजता मोजता जाल थकून

Forbes Richest Women in the World in 2024 : जगातील सर्वात श्रीमंत पुरुष उद्योजक अनेकांना माहिती आहे. पण श्रीमंत महिला उद्योजिका कोण असे म्हटले की, अनेकांना नाव काही आठवत नाही. तर ही 70 वर्षीय उद्योजिका जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे, काय आहे तिचे नाव

ही आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला; संपत्ती मोजता मोजता जाल थकून
जगातील सर्वात श्रीमंत महिला
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 5:51 PM

फोर्ब्स दरवर्षी जगातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर करते. वर्ष 2024 पण सूची फोर्ब्सने जाहीर केली आहे. लक्झरी फॅशन ब्रँड LMVH चे मालक बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? फोर्ब्सच्या यादीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत महिला ही फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers) या आहेत. त्या L’Oréal या सौंदर्य प्रसाधनं (Beauty Product) तयार करणाऱ्या कंपनीच्या मालक आहेत. जगातील एकूण श्रीमंतांच्या यादीत त्यांचा 15 वा क्रमांक आहे.

किती आहे नेटवर्थ

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, 70 वर्षीय फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांची एकूण नेटवर्थ 99.5 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. त्या लॉरियालची संस्थापिका युजीन शुलर (Eugene Schueller) नात आहे. मायर्स आणि त्यांच्या कुटुंबियांकडे लॉरियालची एकूण 34 टक्के वाटा आहे.

हे सुद्धा वाचा

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऐलिस वॉल्टन या आहेत. एलिस वॉलमार्टच्या (Walmart Inc.) संस्थापकांची मुलगी आहे. त्यांची एकूण संपत्ती 72.3 अब्ज डॉलर इतकी आहे. कोच इंडस्ट्रीजच्या जुलिया कोच या जगातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती 64.3 अब्ज डॉलर इतकी आहे. तर एकूण 38.5 अब्ज डॉलरसह जॅकलीन मार्स जगातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. जेफ बेजोस यांची माजी पत्नी MacKenzie Scott ही जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला आहे. तिची संपत्ती 35.6 अब्ज डॉलर इतकी आहे.

  1. फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांच्या आईनेही श्रीमंतांच्या यादीत नाव पटकावलं आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. त्यांची आई लिलियन बेटेनकोर्ट (Liliane Bettencourt) यांचं वयाच्या 94 व्या वर्षी सप्टेंबर 2017 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्यानंतर फ्रेंकोइसने या यादीत नाव कोरलं आहे.
  2. फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांना श्रीमंतीची शिडी चढणे काही सोपे काम नव्हते. त्यांना त्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागला. L’Oréal कंपनीत अधिकार प्राप्त करण्यासाठी त्यांना आईच्या मैत्रिणीशी कायदेशीर लढा द्यावा लागला.
  3. या न्यायालयीन लढाईत त्यांनी विजय मिळवला. फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर झाल्या. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मने जिंकली. त्यांनी सूत्र हाती घेतल्यापासून कंपनीने नफा नोंदविल्याचा दावा करण्यात येत आहे.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.