AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 5 February 2025 : सोने ठरले पुन्हा बाहुबली, चांदी हजार रुपयांनी घसरली, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 5 February 2025 : Budget 2025 सोने आणि चांदी नरमली होती. पण आता सोन्याने गरूड भरारी घेतली आहे. तर चांदी उतरली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशी आहे किंमत?

Gold Silver Rate Today 5 February 2025 : सोने ठरले पुन्हा बाहुबली, चांदी हजार रुपयांनी घसरली, अशा आहेत किंमती
सोने आणि चांदी किंमत
| Updated on: Feb 05, 2025 | 8:40 AM
Share

Budget 2025 नंतर सोने-चांदीने नरमाईचा सूर आळवला होता. तर आता सोन्याने मोठी भरारी घेतली आहे. तर चांदी उतरली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांचे आक्रमक धोरण पाहता, मौल्यवान धातुच्या किंमतीत लवकरच घसरण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प हे पत्नीसाठी क्रिप्टो करन्सीवर मेहरबान दिसू शकतात. तर शेअर बाजारात त्यांच्या कंपन्यांसाठी मदत करू शकतात. त्यातच कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यास दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी घसरण दिसू शकते. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. (Gold Silver Price Today 5 February 2025 )

सोन्याची मोठी भरारी

गेल्या आठवड्यात सोने 2500 रुपयांनी वधारले तर 500 रुपयांनी उतरले. सोमवारी सोन्याच्या किंमतीत 440 रुपयांची घसरण झाली होती. तर दुसर्‍याच दिवशी सोने 115 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 78,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 85,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची किंमत घसरली

जानेवारीच्या अखेरीस चांदीने 3 हजारांची भरारी घेतली. सोमवारी किंमती स्थिर होत्या. 4 फेब्रुवारी रोजी चांदी 1 हजार रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 83,010, 23 कॅरेट 82,678, 22 कॅरेट सोने 76,037 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 62,258 रुपये, 14 कॅरेट सोने 48,561 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,793 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

जळगाव सराफा बाजारात विक्रमी झेप

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर जीएसटीसह ८६ हजार १०८ रुपयांवर पोहोचले असून चांदीचे दर 97 हजार रुपयांवर गेले आहेत. ट्रम्प सरकार अवलंबत असलेल्या धोरणाचे आंतरराष्ट्रीय जगतावर पडसाद उमटत आहेत. त्यामुळे जळगाव च्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सलग सहा दिवसांपासून सोन्याचे दर दररोज उच्चांकी दर पातळी गाठत आहे.सुवर्णनगरीत सोने पुढील आठवड्यात आणखी दीड हजाराने महागण्याचे संकेत असून 90 हजारांचा आकडा पार करेल अशी शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?