AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 5 January 2025 : सोने-चांदीने घेतली ग्राहकांची विकेट, दणादण वाढला भाव, बाजारात खिसा कापल्या जाणार

Gold Silver Rate Today 5 January 2025 : नवीन वर्षात सोने आणि चांदीने ग्राहकांची विकेट काढली. सरत्या वर्षाच्या अखेरीस दोन्ही धातुत मोठी पडझड झाल्याने हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता होती. पण 2025 च्या सुरुवातीलाच दोन्ही धातुनी ग्राहकांचा खिसा कापला.

Gold Silver Rate Today 5 January 2025 : सोने-चांदीने घेतली ग्राहकांची विकेट, दणादण वाढला भाव, बाजारात खिसा कापल्या जाणार
सोने आणि चांदी किंमत
| Updated on: Jan 05, 2025 | 8:32 AM
Share

सरत्या वर्षातील अखेरच्या टप्प्यात सोने-चांदीचे स्वस्ताईचे गिफ्ट फार काळ टिकले नाही. नवीन वर्षाची सुरूवात होतच दोन्ही धातुनी रॉकेट भरारी घेतली. सरत्या वर्षाच्या अखेरीस दोन्ही धातुत मोठी पडझड झाल्याने हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता होती. पण 2025 च्या सुरुवातीलाच दोन्ही धातुनी ग्राहकांचा खिसा कापला. तीनच दिवसात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2000 रुपयांनी महागली. महागाईने सराफा बाजारात ग्राहकांचा खिसा कापला. हाच ट्रेंड कायम राहिल्यास सोने या वर्षाच्या अखेरीस 90 हजारी सलामी देईल. तर चांदी 1 लाख 10 हजारांच्या घरात पोहचले असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मौल्यवान धातुची आता असा आहे भाव (Gold Silver Price Today 5 January 2025 )

सोन्याची रॉकेट भरारी

सरत्या वर्षाच्या अखेरीस सोने 31 डिसेंबर रोजी 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. तर नवीन वर्षात 1 जानेवारी रोजी 440 रुपयांनी, 2 जानेवारीला 330 रूपयांनी तर 3 जानेवारी रोजी 870 अशी एकूण 1600 रुपयांची रॉकेट भरारी सोन्याने घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2,000 रुपयांनी महागली

मागील आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी वधारली होती.31 डिसेंबर रोजी चांदी 1900 रुपयांनी स्वस्त झाली होती. 1 आणि 2 जानेवारी 2025 रोजी किंमतीत बदल दिसला नाही. 3 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी उसळली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,504, 23 कॅरेट 77,194, 22 कॅरेट सोने 70,994 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,128 रुपये, 14 कॅरेट सोने 45,340 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,121 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?