AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 6 May 2024 : अक्षय तृतीयेच्या तोंडावर दरवाढीची बाराखडी; इतके महागले सोने आणि चांदी

Gold Silver Rate Today 6 May 2024 : मे महिन्याच्या पहिल्या पाच-सहा दिवसांत सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. आठवड्याच्या अखेरीस सोने किंचित उसळले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला पण मौल्यवान धातूंनी दरवाढीची वर्दी दिली. काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती?

Gold Silver Rate Today 6 May 2024 : अक्षय तृतीयेच्या तोंडावर दरवाढीची बाराखडी; इतके महागले सोने आणि चांदी
महागले सोने आणि चांदी
| Updated on: May 07, 2024 | 8:46 AM
Share

मे महिन्यात सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली नाही. ग्राहकांना दिलासा मिळाला. सुरुवातीच्या पाच ते सहा दिवसांत सोने केवळ 400 रुपयांच्या घरात महागले तर त्यात जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली. चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. किंचित वाढ आणि तितकीच चांदी स्वस्त झाली. 17 एप्रिलपासून चांदीला मोठी करामत दाखवता आलेली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला, अक्षय तृतीयेच्या तोंडावर चांदीने 1 हजारांची भरारी घेतली तर सोने किंचित वाढले, काय आहेत या मौल्यवान धातूंची किंमत (Gold Silver Price Today 6 May 2024 ) जाणून घ्या…

सोन्याने कूस बदलली

गेल्या आठवड्यात सोने जवळपास 2 हजार रुपयांनी घसरले. तर त्यात 400 रुपयांच्या घरात दरवाढ दिसली. भावात मोठी उसळी आली नाही. मार्च आणि एप्रिलनंतर मे महिन्याची सुरुवात थंड होती. 6 मे रोजी सोने 200 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने घेतली उसळी

17 एप्रिलपासून चांदीला अजूनही मोठी भरारी मारता आली नाही. गेल्या आठवड्यात चांदीने नरमाईचा सुरु आळवला होता. 500 रुपयांनी किंमती वाढल्यानंतर तितकीच घसरण झाली होती. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच चांदीने 1 हजार रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी महागली. 24 कॅरेट सोने 71,816 रुपये, 23 कॅरेट 71,528 रुपये, 22 कॅरेट सोने 65,784 रुपये झाले. 18 कॅरेट 53,862 रुपये, 14 कॅरेट सोने 42,012 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,292 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...