AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 8 September 2024 : गणरायाच्या आगमनाला सोने-चांदीचा दरवाढीला ब्रेक; 10 ग्रॅम सोन्यासाठी पैसे मोजावे लागतील किती?

Gold Silver Rate Today 8 September 2024 : वाजत-गाजत, विधीवत पूजेसह लाडके गणराय घराघरात विराजमान झाले. बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने आणि चांदीने गेल्या दोन आठवड्यातील मरगळ झटकत दरवाढीचा शंखनाद केला. आता या दरवाढीला ब्रेक लागला आहे. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 8 September 2024 : गणरायाच्या आगमनाला सोने-चांदीचा दरवाढीला ब्रेक; 10 ग्रॅम सोन्यासाठी पैसे मोजावे लागतील किती?
सोने आणि चांदीचा भाव काय?
| Updated on: Sep 08, 2024 | 8:32 AM
Share

वाजत-गाजत, ढोल-ताशेंच्या गजरात गणरायाचे घरोघरी आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सवाने चौकाचौकात जणू जान आणली आहे. बाजारात सगळीकडे चैतन्य पसरले आहे. बाप्पाचे आगमन होणाऱ्या सराफा बाजारात दोन्ही धातूच्या किंमतीत कमालीची घसरण झालेली होती. पण गणेश चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी सोने आणि चांदीने मुसंडी मारली. सणासुदीच्या काळात मौल्यवान धातूत वाढ होते हे सर्वश्रूत आहे. त्याला कोणताच सण अपवाद ठरत नाही. या गणेशोत्सवापूर्वी या धातूंनी मुसंडी मारली. पण गणराया विराजमान होताना भावात कोणताही बदल झाला नाही. काय आहेत आता सोने आणि चांदीच्या किंमती? (Gold Silver Price Today 8 September 2024 )

सोन्याची किंमत काय?

या आठवड्यातील सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत बदल दिसला नाही. सलग पाच दिवस या मौल्यवान धातूत पडझड सुरू होती. 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी सोने स्वस्त झाले. 2 सप्टेंबरला किंमती 270 रुपयांनी उतरल्या. 6 सप्टेंबर रोजी सोन्याने 550 रुपयांची मुसंडी मारली. तर 7 सप्टेंबर रोजी दरात कोणताही बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुसंडीनंतर चांदीच्या किंमतीत बदल नाही

गेल्या दोन आठवड्यापासून चांदीच्या किंमतीत मोठा बदल दिसला नाही. या आठवड्यातही सुरुवातीच्या पाच दिवसांत बदल झाला नाही. 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीत एकूण 2 हजारांची घसरण झाली. 6 सप्टेंबर रोजी किंमतीत 2 हजारांची उसळी आली. 7 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,931, 23 कॅरेट 71,643, 22 कॅरेट सोने 65,889 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,948 रुपये, 14 कॅरेट सोने 42,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 83,338 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.