Gold Rate Today : आज सोने 1 लाखाच्या पार? रेकॉर्ड मोडण्यासाठी इतकेच अंतर, अजून किती झेप घेणार?

Gold Rate Cross 1 lakh : सोने आजच एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. तर काहींनी याच महिन्यात सोने एक लाख 30 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची झेप घेईल असा दावा करण्यात येत आहे. तर चांदी सुद्धा मोठी झेप घेण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Gold Rate Today : आज सोने 1 लाखाच्या पार? रेकॉर्ड मोडण्यासाठी इतकेच अंतर, अजून किती झेप घेणार?
सोने आज रेकॉर्ड मोडणार?
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 18, 2025 | 8:38 AM

सोने आजच एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आता सोने 97 हजारांपेक्षा जास्त आहे. जळगाव सराफा बाजारात सुद्धा सोने जीएसटीसह 97 हजारांच्या घरात पोहचले आहे. तर काहींनी याच महिन्यात सोने एक लाख 30 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची झेप घेईल असा दावा करण्यात येत आहे. तर चांदी सुद्धा मोठी झेप घेण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सोन्याची मोठी मुसंडी

मार्च महिन्यापासून आतापर्यंत सोन्याने मोठी झेप घेतली आहे. या आठवड्यातही सोने सतत वधारत आहे. 16 एप्रिल रोजी 990 रुपये, तर 17 एप्रिल रोजी सोने 1140 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 89,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पण नाही मागे

मार्च महिन्यापासून चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. भावात पडझड पण दिसून येत आहे. या आठवड्यात चांदीने 200 रुपयांची झेप घेतली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 94,910, 23 कॅरेट 94,530, 22 कॅरेट सोने 86,938 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 71,183 रुपये, 14 कॅरेट सोने 55,522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,151 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.