Gold Price Today : 1 लाखांचा टप्पा ओलांडणार की दणकावून आपटणार सोने? काय आहेत सध्या भाव?
Gold Price Cross 1 lakh Or Crash : 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना आता 1 लाख रुपये मोजावे लागतील असा अंदाज दिसतोय. सध्या सोने एक लाखांच्या टप्प्यात आहे. तर काही तज्ज्ञ सोन्याच्या किंमती 43 टक्क्यांपर्यंत घसरणार असल्याचा दावा करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत जबरदस्त तेजी दिसून आली. सोबतच चांदीने पण ग्राहकांचे डोळे पांढरे केले आहेत. अमेरिका आणि चीनच्या धोरणांमुळे जगावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी जागतिक गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना आता 1 लाख रुपये मोजावे लागतील असा अंदाज दिसतोय. सध्या सोने एक लाखांच्या टप्प्यात आहे. तर काही तज्ज्ञ सोन्याच्या किंमती 43 टक्क्यांपर्यंत घसरणार असल्याचा दावा करत आहेत.
सोने @ 1 लाख
Sprott Asset Management चे रायन मॅकइंटायर यांनी सध्याच्या भू राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे सोन्यात दरवाढीची शक्यता आहे.
Kama Jewelry चे कोलिन शाह यांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेने दोनदा रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे सोन्याने एक लाखांचा टप्पा ओलांडला तर आश्चर्य वाटायला नको
Motilal Oswal Financial Services चे किशोर नार्ने यांच्या मते, सोन्याच्या किंमतींना मर्यादा नाही. सोने 4000-5000 डॉलर प्रति औंसवर जाऊ शकते.
सोने 38-43 टक्क्यांपर्यंत घसरेल?
Morningstar चे मार्केट स्ट्रॅटजिस्ट जॉन मिल्सच्या अंदाजानुसार, सोने 1820 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरण होऊ शकते. सध्याच्या 3,198 डॉलर प्रति औंसपासून जवळपास 43 टक्क्यांची घसरण येऊ शकते. भारतात सोन्याचा भाव सध्या 95,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यामध्ये जर 43 टक्क्यांपर्यंतची घसरण गृहीत धरली तर सोन्याचा भाव 54,526 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरतील. ही माहिती मनीकंट्रोल संकेतस्थळाच्या वृत्ताआधारे देण्यात आली आहे.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
