AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने घेणार मोठी झेप, जागतिक घडामोडींचा होणार परिणाम थेट

Gold Silver Rate Today : सोने लवकरच भरारी घेण्याच्या तयारीत आहे. तर चांदीला पण लकाकी येणार आहे. जागतिक घडामोडी सध्या सोने-चांदीच्या पदरात पडल्या आहेत. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय सोन्याच्या पथ्यावर पडला आहे.

Gold Silver Rate Today : सोने घेणार मोठी झेप, जागतिक घडामोडींचा होणार परिणाम थेट
| Updated on: Jul 13, 2023 | 9:23 AM
Share

नवी दिल्ली : सोन्याला अच्छे दिन येण्याची शक्यता दाट आहे. तर त्यापाठोपाठ चांदी पण वधारणार आहे. जागतिक पातळीवर घडामोडच तशी घडत आहे. अमेरिकेत रेकॉर्ड ब्रेक महागाईचा मोठा दबाव वाढला आहे. अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह आक्रमक होऊ शकते. पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक व्याजदर आकारण्याची भीती आहे. तर केंद्र सरकारने सोन्याच्या कोणतेही कलाकुसर नसलेल्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. केंद्राने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने हे पाऊल टाकण्यात आले आहे. त्याचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून येईल. दागिन्यांच्या किंमतीत वाढ दिसेल. तर सोने आणि चांदी आता गगन भरारी घेण्याची शक्यता आहे. सोने-चांदीत (Gold Silver Price Today) इतकी वाढ झाली आहे.

हजार रुपयांची भरारी जुलै महिन्यात खऱ्या अर्थाने सोने आगेकूच करत आहे. गेल्या दोन महिन्यात, मे आणि जून मध्ये किंमतीत मोठी तफावत दिसली नाही. भावात चढउतार होता. पण दर घसरणीवरच होते. जुलै महिन्यात सोन्याने मोठा पल्ला गाठला. एक हजार रुपयांची दरवाढ झाली. चांदी 1300 रुपयांनी वधारली. यामुळे गुंतवणूकदारांना उकळ्या फुटल्या आहेत. त्यांना अधिक फायदा मिळेल.

या महिन्यात भरारी 13 जुलै रोजीचे दर अपडेट झालेले नाही. 12 जुलै रोजी सोन्यात 210 रुपयांची वृद्धी झाली. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वधारले. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची उसळी घेतली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7, आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण दिसून आली. काल 12 जुलै रोजी, 22 कॅरेट सोने 54,800 रुपये तर 24 कॅरेट सोने 59770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

  1. 12 जुलै, 24 कॅरेट सोने 58,786 रुपये
  2. 23 कॅरेट 58,551 रुपये
  3. 22 कॅरेट सोने 53,848 रुपये
  4. 18 कॅरेट 44,090 रुपये
  5. 14 कॅरेट सोने 34,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले
  6. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे
  7. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते
  8. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते

किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल