Gold Silver Price Today : सोने खरेदीदारांची ‘चांदी’! भावात चार अंकी घसरण

Gold Silver Price Today : गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. ऐन लग्नसराईत सोन्याने मारलेल्या उसळीने सर्वांनाच घाम फुटला होता. पण आता महिनाभरापासून सोने उतरणीला लागले आहे. चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे.

Gold Silver Price Today : सोने खरेदीदारांची 'चांदी'! भावात चार अंकी घसरण
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:57 AM

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. ऐन लग्नसराईत सोन्याने मारलेल्या उसळीने सर्वांनाच घाम फुटला होता. पण आता महिनाभरापासून सोने उतरणीला लागले आहे. चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने 116 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त तर चांदी 439 रुपये प्रति किलोने घसरली. सोन्याचा भाव (Gold Price Update) 55600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीची किंमत (Silver Price) 63000 रुपये प्रति किलोच्या जवळपास होती. गुडरिटर्न्सनुसार, बुधवारी, 1 मार्च 2023 रोजी 22 कॅरेट सोने 51,600 रुपये तर 24 कॅरेट सोने 56,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

फेब्रुवारी महिन्यात 2 तारखेला सोन्याने एकदम उसळी घेतली होती. सोन्याचा भाव 58,470-58882 रुपये या दरम्यान होता. तर सोन्याने फेब्रुवारीतच नीच्चांक नोंदवला. 27 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 56,020 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 56,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोमवारी भावात 160 रुपयांची घसरण होऊन हा भाव 56,170 रुपये होता. सोन्याचा भाव सातत्याने उतरणीला असल्याचे दिसून येते.

वायदे बाजारात 24 कॅरेट सोने 116 रुपयांनी स्वस्त होऊन 55550 रुपयांवर पोहचले, 23 कॅरेट सोने 115 रुपयांनी स्वस्त होऊन 55328 रुपये, 22 कॅरेट सोने 106 रुपयांनी घसरुन 50884 रुपये, 18 कॅरेट सोने 87 रुपयांनी स्वस्त होऊन 41663 रुपये तर 14 कॅरेट सोने 68 रुपयांनी स्वस्त झाले. 32497 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ते व्यापार करत आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्याने 2 फेब्रुवारी रोजी उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या 3300 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव उतरले आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने 58,470-58882 रुपये या दरम्यान होता. चांदीने 79980 रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या चांदी 16973 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे.

गुडरिटर्न्सनुसार,मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,120 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,120 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,120 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,480 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,150 रुपये आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.