AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार पडताळणीसाठी सरकारकडून नवा नियम जारी, आता ऑफलाईन ई-केवायसी करा

सरकारने 8 नोव्हेंबर 2021 रोजी आधार विनियम 2021 अधिसूचित केले आणि 9 नोव्हेंबर 2021 रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले. हे नियम ई-केवायसीसाठी आधारच्या ऑफलाईन पडताळणीसाठी तपशीलवार प्रक्रिया मांडतात. येथे KYC म्हणजे 'ग्राहक जाणून घ्या' जे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल. त्यामुळे त्याचे नाव ई-केवायसी असे देण्यात आलेत.

आधार पडताळणीसाठी सरकारकडून नवा नियम जारी, आता ऑफलाईन ई-केवायसी करा
Pan Aadhaar Link Date
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 4:25 PM
Share

नवी दिल्लीः सरकारने आधार पडताळणीबाबत नवा नियम जारी केलाय. हा नवा नियम आधारच्या ऑफलाईन पडताळणीबाबत आहे. आता लोक त्यांचे आधार ऑफलाईन किंवा कोणत्याही इंटरनेटशिवाय किंवा ऑनलाईन पडताळण्यास सक्षम असतील, यासाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्र द्यावे लागतील. हे डिजिटल स्वाक्षरी केलेले दस्तऐवज आधारची सरकारी संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जावेत. या दस्तऐवजावर वापरकर्त्याच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार वर्ण दिलेले आहेत.

आधारच्या ऑफलाईन पडताळणीसाठी तपशीलवार प्रक्रिया

सरकारने 8 नोव्हेंबर 2021 रोजी आधार विनियम 2021 अधिसूचित केले आणि 9 नोव्हेंबर 2021 रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले. हे नियम ई-केवायसीसाठी आधारच्या ऑफलाईन पडताळणीसाठी तपशीलवार प्रक्रिया मांडतात. येथे KYC म्हणजे ‘ग्राहक जाणून घ्या’ जे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल. त्यामुळे त्याचे नाव ई-केवायसी असे देण्यात आलेत.

नव्या नियमात काय?

या नवीन नियमात आधार धारकाला एक पर्याय मिळतो की, तो आधार ई-केवायसी पडताळणीच्या प्रक्रियेसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला आपला आधार पेपरलेस ऑफलाईन ई-केवायसी देऊ शकतो. यानंतर ती एजन्सी केंद्रीय डेटाबेसशी आधार धारकाने दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता इत्यादीशी जुळते. जुळणीबरोबर असल्याचे आढळल्यास पडताळणीची प्रक्रिया पुढे नेली जाते. आधार पेपरलेस ऑफलाईन ई-केवायसी UIDAI द्वारे जारी केलेल्या डिजिटल स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवजाचा संदर्भ देते. या दस्तऐवजात आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अक्षर, नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो यांची माहिती आहे. सरकारने जारी केलेला नवीन नियम आधार धारकाला सत्यापन एजन्सीला नकार देण्याचा अधिकार देतो की त्याचा कोणताही ई-केवायसी डेटा संग्रहित केला जाऊ नये. जेव्हा पडताळणी करायची असेल तेव्हाच ई-केवायसी डेटा वापरला जाईल, अन्यथा एजन्सी आधार धारकाची कोणतीही माहिती ठेवणार नाही. वापरकर्त्याच्या सांगण्यावरून आधार पडताळणी एजन्सीला सर्व डेटा हटवावा लागेल आणि वापरकर्त्याला त्याबद्दल पोचपावती द्यावी लागेल.

ऑफलाईन आधार पडताळणीचे प्रकार

?नियमांनुसार UIDAI खालील प्रकारच्या ऑफलाईन पडताळणी सेवा प्रदान करेल: ? QR कोड पडताळणी ?आधार पेपरलेस ऑफलाईन ई-केवायसी पडताळणी ?ई-आधार पडताळणी ?ऑफलाईन पेपर आधारित पडताळणी ?UIDAI द्वारे वेळोवेळी ऑफलाईन पडताळणीचा कोणताही अन्य प्रकार सादर केला जातो ?UIDAI क्यूआर कोड, आधार पेपरलेस ऑफलाईन ई-केवायसी किंवा ई-आधार डाउनलोड करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन, वेबसाईट किंवा इतर माध्यम प्रदान करते

आधार पडताळणी पद्धती

?ऑनलाईन आधार पडताळणीसाठी इतर अनेक प्रणाली अस्तित्वात आहेत. खाली आधार पडताळणीच्या विविध पद्धती आहेत, ज्या ऑफलाईन पर्यायांसह उपस्थित आहेत. ?लोकसंख्याशास्त्रीय प्रमाणीकरण ?एक-वेळ पिन आधारित प्रमाणीकरण ?बायोमेट्रिक आधारित प्रमाणीकरण ?मल्टी फॅक्टर प्रमाणीकरण सरकारने आधार पडताळणी ई-केवायसी प्रक्रिया ऑफलाईन किंवा ऑनलाईन मोडद्वारे अधिक सोयीस्कर केलीय. आधार डेटा सत्यापित करणार्‍या अधिकृत एजन्सी कोणताही योग्य प्रमाणीकरण मोड निवडू शकतात आणि सुरक्षा वाढविण्यासाठी बहु-घटक प्रमाणीकरण देखील निवडू शकतात.

संबंधित बातम्या

UIDAI कडे तुमचे बँक, पॅन कार्डसह अनेक गोपनीय तपशील; धोका तर नाही ना?

5G Spectrum Auction: 5G स्पेक्ट्रमचा कधी लिलाव होणार, दूरसंचार मंत्री म्हणाले…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.