5G Spectrum Auction: 5G स्पेक्ट्रमचा कधी लिलाव होणार, दूरसंचार मंत्री म्हणाले…

भारतात स्पेक्ट्रम लिलावानंतर लवकरच 5G सेवा सुरू होऊ शकते. पूर्वी 2G आणि 3G सेवा भारतात चालत होत्या. त्यानंतर 4G नेटवर्क आल्याने इंटरनेट स्पीडमध्ये बरीच वाढ झाली. स्वस्त इंटरनेटही तेव्हापासून सुरू झाले. 5G नेटवर्कवरून अल्ट्रा एचडी दर्जाचे व्हिडीओ कॉलिंगदेखील करता येते. तसेच स्मार्ट उपकरणांमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल. हे विद्यमान 4G LTE तंत्रज्ञानापेक्षा जलद गतीसाठी तयार केलेय.

5G Spectrum Auction: 5G स्पेक्ट्रमचा कधी लिलाव होणार, दूरसंचार मंत्री म्हणाले...
5G

नवी दिल्ली : 5G स्पेक्ट्रमचा लिलाव एप्रिल-मे 2022 च्या आसपास होईल, असं दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणालेत. सुधारणांची पहिली फेरी दूरसंचार कंपन्यांसाठी सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मदत उपायांसह झालीय. केंद्र सरकार यापुढेही सुधारणा करत राहील. येत्या दोन-तीन वर्षांत दूरसंचार नियामक संरचना बदलली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताच्या दूरसंचार क्षेत्राचे नियमन सर्वोत्तम जागतिक मानकांनुसार केले पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यात अनेक सुधारणा करू, असंही त्यांनी सांगितले.

2022 च्या मध्यापर्यंत त्यांचा अहवाल सादर करणार

5G लिलावाच्या अंतिम मुदतीबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की, लिलावाच्या संरचनेवर लक्ष केंद्रित करणारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) या विषयावर चर्चा करत आहे. ते फेब्रुवारी 2022 च्या मध्यापर्यंत त्यांचा अहवाल सादर करतील. अहवाल मार्च 2022 मध्ये प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. अहवाल आल्यानंतर लगेचच स्पेक्ट्रमचा लिलाव करू, असंही अश्विनी वैष्णव म्हणालेत. यापूर्वी दूरसंचार विभागाने (DoT) आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची आशा व्यक्त केली होती.

5G नेटवर्कचा वापरकर्त्यांना काय फायदा?

भारतात स्पेक्ट्रम लिलावानंतर लवकरच 5G सेवा सुरू होऊ शकते. पूर्वी 2G आणि 3G सेवा भारतात चालत होत्या. त्यानंतर 4G नेटवर्क आल्याने इंटरनेट स्पीडमध्ये बरीच वाढ झाली. स्वस्त इंटरनेटही तेव्हापासून सुरू झाले. 5G नेटवर्कवरून अल्ट्रा एचडी दर्जाचे व्हिडीओ कॉलिंगदेखील करता येते. तसेच स्मार्ट उपकरणांमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल. हे विद्यमान 4G LTE तंत्रज्ञानापेक्षा जलद गतीसाठी तयार केलेय.

5G नेटवर्क 4 तंत्रज्ञानावर काम करते

5G नेटवर्क नॉन-स्टँडअलोन 5G (NSA-5G), स्टँडअलोन 5G (SA-5G), सब-6 GHz आणि mmWave या चार प्रकारच्या तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. कोणत्याही प्रदेशात या चार तंत्रज्ञानाद्वारे वापरकर्त्यांच्या उपकरणांवर 5G नेटवर्क वितरित केले जाते. यापैकी NSA-5G ला मूलभूत 5G नेटवर्क बँड म्हणतात. हा स्पेक्ट्रम नेटवर्क चाचणीसाठी वापरला जातो. यानंतर SA-5G नेटवर्क स्वतःच्या क्लाउड नेटिव्ह नेटवर्क कोरवर काम करते. नंतर Sub-6 GHz ला मिड बँड 5G स्पेक्ट्रम वारंवारता म्हणतात. चौथ्या नेटवर्क mmWave ला High Band 5G नेटवर्क फ्रिक्वेन्सी म्हणतात.

संबंधित बातम्या

रेल्वे लवकरच Special Trains थांबवणार; सामान्य भाडे लागू होणार

आधारमध्ये बायोमेट्रिक अपडेट करायचेय, मग किती शुल्क लागणार; जाणून घ्या

Published On - 12:03 am, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI