AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधारमध्ये बायोमेट्रिक अपडेट करायचेय, मग किती शुल्क लागणार; जाणून घ्या

आधारमधील डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. आधार मदत केंद्राने एका यूजरच्या तक्रारीवरून ही माहिती दिलीय, ज्याने नवीन आधार बनवण्यासाठी आधार केंद्रावर 250 रुपये आकारले जात असल्याचे सांगितले होते.

आधारमध्ये बायोमेट्रिक अपडेट करायचेय, मग किती शुल्क लागणार; जाणून घ्या
आ
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Nov 11, 2021 | 9:20 PM
Share

नवी दिल्लीः Aadhaar Biometric Update: तुम्हाला तुमचे आधार अपडेट करायचा असेल तर त्यासाठी आकारले जाणारे शुल्क जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्याकडून जास्त शुल्क आकारले जात असेल, तर तुम्ही त्याबाबत तक्रारही करू शकता. UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने आधार सेवा पुरवणाऱ्या संस्थेने आधार अपडेट करण्यासाठी शुल्क दिले.

बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते

आधारमधील डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. आधार मदत केंद्राने एका यूजरच्या तक्रारीवरून ही माहिती दिलीय, ज्याने नवीन आधार बनवण्यासाठी आधार केंद्रावर 250 रुपये आकारले जात असल्याचे सांगितले होते. त्यांनी ट्विट केले आहे की, UIDAI कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी अतिरिक्त पैसे आकारण्याबाबत खूप कडक आहे. यासोबत त्याने सांगितले की, जर तुमच्याकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असेल तर तुम्ही तक्रारही करू शकता.

तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून तक्रार करा

त्याबद्दल तक्रार करण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही help@uidai.gov.in वर ईमेल देखील करू शकता. UIDAI ने सांगितले की, तुम्ही घरी बसून ऑनलाईन दिलेल्या अतिरिक्त पैशांबद्दल तक्रार देखील करू शकता, यासाठी तुम्हाला थेट UIDAI- resident.uidai.gov.in/file-complaint या लिंकवर जावे लागेल.

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी ‘या’ टप्प्यांचे पालन करा

सर्वप्रथम UIDAI वेबसाईट uidai.gov.in वर या लिंकवर क्लिक करा किंवा थेट resident.uidai.gov.in/file-complaint. पुढे तुमचा 14 क्रमांकाचा EID क्रमांक, तारीख आणि वेळ एंटर करा. त्यानंतर आपले नाव आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. आता तुमचा ईमेल आयडी आणि पोस्टल पिन कोड आणि इतर तपशील प्रविष्ट करा. तुमच्या तक्रारीचा प्रकार आणि श्रेणी निवडा. यानंतर तुमची तक्रार तपशीलवार लिहा. त्यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा. आता खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा. या सर्व टप्प्यांचे पालन केल्यानंतर तुमची तक्रार यशस्वीरित्या नोंदविली जाईल.

संबंधित बातम्या

सावधान! तुम्हालाही आयकराचे मेसेज येतायत? चुकूनही रिफंड SMSच्या फंदात पडू नका, अन्यथा…

सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढली, ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 303 कोटींची गुंतवणूक

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण