AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून अलर्ट! WhatsApp वर आलेल्या ‘या’ लिंकमुळे होऊ शकते फसवणूक

कोरोनामुळे, मोठ्या संख्येने लोक घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढला आहे.

सरकारकडून अलर्ट! WhatsApp वर आलेल्या 'या' लिंकमुळे होऊ शकते फसवणूक
हे नवं फिचर लाँच करण्यामागे लोकांची प्रायव्हसी अबाधित राहावी, युजर्समधील बातचित त्यांच्यातच सिमित राहावी हा एकमेव उद्देश असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
| Edited By: | Updated on: Nov 27, 2020 | 11:58 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या जीवघेण्या काळात देशात बँकिंग फसवणूकीचे धक्कादायक प्रकार सातत्याने वाढत आहेत. यासाठी इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपचा वाढता वापर हे मोठं कारण आहे. खरंतर, कोरोनामुळे, मोठ्या संख्येने लोक घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढला आहे. हल्ली ऑफिसची सगळी कामं व्हॉट्सअ‍ॅपवर होतात. पण याचाच गैरफायदा सायबर गुन्हे वाढले आहेत. (government warns people to not click fraud link in whatsapp message)

आताही व्हॉट्सअ‍ॅपवर असाच एक फसवणूक करणारा मेसेज फिरत आहे. ज्यामध्ये कोरोनाच्या संकटात फंड मिळवण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला असाच एखादा मेसेज आला तर सावधगिरी बाळगा. कारण, तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याशी शक्यता आहे. या माहितीचा कुठल्याही कामासाठी गैरवापर केला जाऊ शकतो.

या सायबर गुन्ह्यांसंबंधी सरकारने नागरिकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून फसवणूक करत असल्याचं सरकारने म्हटलं आहे. यामध्ये सरकारकडून कोरोना साथीच्या रोगासाठी मदत निधी मिळत असल्याचं सांगत फसवणूक होत आहे. पण हे खोटं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मेसेजमध्ये वापरकर्त्यांना दिलेल्या लिंकवर क्लिक करून आवश्यक तपशील भरायला सांगितला जातो. तुम्ही तुमची माहिती भरताच मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे खासगी माहिती विचारणारा कोणताही मेसेज आला तर सावधान राहा असं सराकरकडून सांगण्यात येत आहे. (government warns people to not click fraud link in whatsapp message)

इतर बातम्या – 

Fact Check : खरंच मोदी सरकार कोरोना फंडिंगने प्रत्येकाला 1 लाख 30 हजार रुपये देणार का?

अलर्ट! 1 डिसेंबरपासून बदलणार हे नियम, सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल कात्री

(government warns people to not click fraud link in whatsapp message)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?