Air India : टाटा ग्रुपने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले, पंधरा दिवसांत दोन मोठ्या गिफ्टची घोषणा

| Updated on: Apr 19, 2022 | 12:58 PM

टाटा ग्रुपच्या (Tata Group) हातात एअर इंडियाची (Air India) कमान येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं  नशीब देखील बदलले आहे. एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. एअर इंडियाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना आता ग्रुप मेडिकल विमा योजनेची (Group Medical Insurance Scheme) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Air India : टाटा ग्रुपने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले, पंधरा दिवसांत दोन मोठ्या गिफ्टची घोषणा
Image Credit source: Facebook
Follow us on

टाटा ग्रुपच्या (Tata Group) हातात एअर इंडियाची (Air India) कमान येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं  नशीब देखील बदलले आहे. एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. एअर इंडियाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना आता ग्रुप मेडिकल विमा योजनेची (Group Medical Insurance Scheme) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील प्रमुख रुग्णालयात कर्मचाऱ्यांना या योजनेंतर्गत उपचार मिळावेत यासाठी एका मोठ्या नेटवर्कबरोबर टायप करण्यात आले आहे. 15 एप्रिल 2022 पासून कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे. ही सुविधा कंपनीतील स्थाई आणि अस्थाई भारतीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. 15 दिवसांमध्ये एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना डबल गिफ्ट मिळाले आहे. आठवडाभरापूर्वीच कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. आणि आता त्यांना ग्रुप आरोग्य विम्याचा लाभ देखील देण्यात आला आहे.

किती रुपयांचा आरोग्य विमा मिळणार?

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना साडेसात लाखांचा आरोग्य विमा कंपनीच्या वतीने देण्यात येणार आहे. कुटुंबातील जास्तीतजास्त सात लोकांचा समावेश या ग्रुप पॉलिसीमध्ये होऊ शकणार आहे. म्हणजेच कुटुंबातील सात जणांना विम्याचे कवच मिळेल. यामध्ये पती-पत्नी तीन मुलं आणि आई-वडील यांचा समावेश असणार आहे. जर संबंधित कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांचा समावेश हा विम्यामध्ये करण्यात आला नाही तर सासू-सासऱ्यांचा समावेश देखील करता येऊ शकतो. या कर्मचाऱ्यांना देशातील प्रमुख रुग्णालयात या पॉलिसींतर्गत उपचार मिळणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

कर्मचाऱ्यांना कंपनीकडून डबल गिफ्ट मिळाले आहे. एक तर त्यांना आरोग्य विम्याचा लाभ तर मिळालाच आहे. सोबत पगारात देखील वाढ झाली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कोरोना काळात कपात करण्यात आली होती. मात्र आता पु्न्हा एकदा त्यांचे वेतन वाढवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वीस ते पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून नवी वेतनवाढ लागू करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Today Gold Silver Price: आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात तेजी, चांदी सत्तर हजारांवर, चेक करा तोळ्या तोळ्याचा भाव

RBI report: जागतिक घडामोडींचा प्रतिकूल परिणाम, मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत – आरबीआय

Share Market Updates : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा