RBI report: जागतिक घडामोडींचा प्रतिकूल परिणाम, मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत – आरबीआय

युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर झालेला परिणाम पहाता याचा फटका हा भारतीय अर्थव्यवस्थेला (Economy) देखील बसू शकतो, असे भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi) म्हटले आहे. आरबीआयकडून सोमवारी मासिक रिपोर्ट जारी करण्यात आला. या रिपोर्टमध्ये आरबीआयकडून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

RBI report: जागतिक घडामोडींचा प्रतिकूल परिणाम, मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत - आरबीआय
रिझर्व्ह बँकImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:27 AM

युक्रेन आणि रशियासोबत (Russia) भारताचे द्विपक्षीय व्यापारी संबंध म्हणावे तेवढे मजबूत नाहीत. मात्र गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर झालेला परिणाम पहाता याचा फटका हा भारतीय अर्थव्यवस्थेला (Economy) देखील बसू शकतो, असे भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi) म्हटले आहे. आरबीआयकडून सोमवारी मासिक रिपोर्ट जारी करण्यात आला. या रिपोर्टमध्ये आरबीआयकडून ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. आरबीआयने आपल्या अहवामध्ये म्हटले आहे की, सध्या स्थितीत भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीमध्ये आहे. देशात 600 अब्ज डॉलर पेक्षा जास्त विदेशी मुद्रा भंडार आहे. मात्र तरी देखील जागतिक परिस्थितीचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यासाठी तसेच महागाईचा रेट कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयकडून काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत.

काय म्हटलंय अहवालात?

येत्या काळात खासगी क्षेत्रात किती गुंतवणूक होते, यावर बऱ्याच प्रमाणात अर्थव्यवस्थेचे भविष्य अवलंबून असणार आहे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्नन सुरू आहे. भारतात विदेशी गुंतवणूक देखील वाढत आहे. मात्र ती आणखी कशी वाढेल याकडे केंद्राचे लक्ष आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. तसाच तो भारताला देखील बसला आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. दुसरीकडे कच्चा तेलाच्या दरात देखील सातत्याने चढ-उतार सुरू आहे. या सर्वांचा परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. महागाई वाढली आहे. खाद्य तेलापासून ते इंधनापर्यंत सर्वच गोष्टींच्या दरात वाढ झाली आहे. मात्र या वाढत्या महागाईला जागतिक परिस्थिती जबाबदार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट

आरबीआयने आपल्या मासिक अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होऊ शकते असे आरबीआयने म्हटले आहे. युद्धामुळे सप्लाय चैन बाधित झाली आहे. जागतिक स्थरावर महागाई देखीव वाढत आहे. अनेक देश हे आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. युद्धामुळे काही गोष्टींचा पुरवाठा ठप्प झाल्याने भाव वाढले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Share Market Updates : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा

Manappuram Finance : मणप्पुरम फयनान्सला साडेसतरा लाखांचा दंड, नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी आरबीआयची कारवाई

Today’s petrol, diesel prices : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.