
GST Reforms : जीएसटीचे नवीन दर लागू झाले आहेत. गेल्या दोन दशकात पहिल्यांदात पारले-जी बिस्किट पुड्याची किंमती कमी झाली आहे. या कंपनीचा छोटा पुडा 5 रुपयांना मिळत होता. तो आता 4.45 रुपयांवर आला. केवळ पारले-जी नाही तर इतर अनेक कंपन्यांनी किंमती कमी केल्या आहेत. पण त्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे. एक रुपयांचे चॉकलेट, टॉफी ही आता 88 पैशांना मिळत आहे. तर 2 रुपयांच्या शॅम्पूची पुडी, सॅच आता 1.77 रूपयांना मिळत आहे. GST वरुन अजूनही संभ्रम असल्याचे या आकड्यावरून समोर येत आहे. उत्पादनाचं वजन कमी न करता किंमत घटवली तर सरकार ही कपात योग्य ठरवेल की नाही याचा अंदाज उत्पादकांना अजून आलेला नाही. त्यामुळे आहे तशी कपात लागू झाली आणि त्याने सुट्या पैशांच्या मोठी अडचण झाली. कारण दुकानदार ही वस्तू सुट्या पैशात विक्री करू शकणार नाही. ग्राहकाला मूळ किंमतच द्यावी लागेल असे दिसते.
पारले जी उत्पादनाचे उपाध्यक्ष मयंक शाह यांच्या मते सुरुवातीला याचा परिणाम दिसेल. पण ग्राहकांकडे UPI पेमेंटचा पर्याय आहे. मोठा पॅक खरेदी केला तर मग हे गणित गडबडणार नाही. आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे. कर कपातीचा फायदा उत्पादनाचे वजन वाढवून ग्राहकांना देण्याचा आहे. सरकार तशी परवानगी देईल असे वाटते, असे ते म्हणाले.
GST चा फायदा
कॅडबरी चॉकलेट तयार करणारी कंपनी मोंडलेजने सर्व प्रकारच्या उत्पादनाच्या किंमती कमी केल्या आहेत. पण त्यांच्या किंमती ही अशाच विचित्र झाल्या आहेत. बॉर्नविटा आता 26.69 रुपयांवर आले आहे. पूर्वी त्याची किंमत 30 रुपये होती. ओरियो बिस्कीट 8.90 रुपयांना मिळेल. पूर्वी ते 10 रुपयांना मिळत होते. जेम्स आणि 5 स्टारचे 20 रुपयांचे पॅक आता 17.80 रुपयांना मिळेल. मोंडलेज कंपनीने ग्राहकांना आणि डीलर्सला नवीन किंमतीत जीएसटीचा फायदा एकत्रित असल्याचे म्हटले आहे.
या सर्व कंपन्यांना वाटते की जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचला पाहिजे. अनेक वस्तू या कमी टॅक्स स्लॅबमध्ये आल्या आहेत. सध्या अनेक कंपन्यांनी ही कपात केली आहे. पण त्यांनी जी नवीन किंमत ठेवली आहे. ती नगदीत, रोखीत देणे ग्राहकांना अशक्य आहे. त्यामुळे या कपातीचा पूर्ण फायदा त्यांना मिळणार नाही. दुकानदारांनावरील पैशांचा दिवसाकाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. युपीआय पेमेंटमध्ये ही अडचण येणार नाही.