AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : शेती गेली, जनावरं मेली, तात्काळ मदत द्या… शेतकऱ्यांनी केली मागणी, गिरीश महाजन म्हणाले मी पैसे घेऊन आलो नाही

Girish Mahajan : सध्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले. त्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने संताप व्यक्त होत आहे.

Girish Mahajan : शेती गेली, जनावरं मेली, तात्काळ मदत द्या... शेतकऱ्यांनी केली मागणी, गिरीश महाजन म्हणाले मी पैसे घेऊन आलो नाही
गिरीश महाजन
| Updated on: Sep 24, 2025 | 1:33 PM
Share

अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने मराठवाडा, विदर्भातील नागरिक हैराण झाले आहेत. मुसळधार पावसाने अनेक गावांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. तर आजपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. ते नुकसानीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांचं घरं, पीकं आणि जनावराचं मोठं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)काल धाराशिव दौऱ्यावर होते. त्यावेळी महाजन उशीरा पाहण्यासाठी आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर यंत्रणा पंचनामे करत नसल्याने पण शेतकरी संतप्त आहेत. त्यात काही शेतकऱ्यांनी महाजनांचा ताफा अडवला. त्यातच महाजन यांच्या एका वक्तव्यावरून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

मी पैसे घेऊन आलो नाही

धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांचे शेकडो जनावरं वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडून धरला. गिरीश महाजन आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. जनावर मेली आहेत तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो, मी पैसे घेऊन आलो नाही असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. महाजन यांच्या असंवेदनशीलतेवर विरोधकांनी टीका केली. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे निघाले.

संकट मोचक तरी व्हा

मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. तुम्ही जसे भाजप सरकारचे संकट मोचक झालात तसं शेतकऱ्याचं का होत येत नाही, असा सवाल कडू यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी बोलताना विचारला. किमान चांगलं बोलता येत नसेल तर जावू नका न कोणी आग्रह केला, असा सवाल त्यांनी केला. देत तर काहीच नाही उलटून अशी भाषा करत असेल तर निषेध करतो असे बच्चू कडू म्हणाले.

Follow Us
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश