मोदी सरकारचा दिवाळी धमाका! GST अजून कमी होणार, पंतप्रधानांनी काय दिले संकेत

GST Rate Reduced Again : GST 2.0 मुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पण इतक्यावरच ही आनंदवार्ता थांबलेली नाही. तर मोदी सरकार दिवाळी धमाका करण्याच्या विचारात आहे. जीएसटीमध्ये मोठी कपात होण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारचा दिवाळी धमाका! GST अजून कमी होणार, पंतप्रधानांनी काय दिले संकेत
जीएसटीत पुन्हा कपात
| Updated on: Sep 25, 2025 | 1:28 PM

GST Reforms 2.0 : जीएसटी दरात अजून कपातीची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत. 8 वर्षांपूर्वी जीएसटी व्यवस्था देशभरात लागू झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी दरात मोठा बदल झाला. त्याचा फायदा थेट ग्राहकांना होत आहे. जीएसटी परिषदेने जवळपास 400 वस्तूंवरील जीएसटी दरात कपातीचा निर्णय घेतला होता. 22 सप्टेंबर रोजी नवरात्रीपासून ही दर कपात लागू झाली होती. जसा जसा देश आर्थिक बाबतीत मजबूत होईल, तसा तसा नागरिकांवरील कराचे ओझे कमी होईल असे पंतप्रधान म्हणाले. आता अजून जीएसटी दरात कपातीचे संकेत मिळत आहेत.

देशात जीएसटी उत्सव

पंतप्रधान मोदी यांनी नोएडात उत्तर प्रदेश ट्रेड शोचे उद्धघाटन केले. त्यावेळी देशात जीएसटी उत्सव सुरू असल्याचे ते म्हणाले. पण सरकार येथेच थांबणार नसल्याचे ते म्हणाले. 2017 मध्ये सरकारने जीएसटी लागू करुन अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम केले. यंदा त्यात बदल झाला आहे. जसा जसा देश आर्थिक बाबतीत मजबूत होईल, तसा तसा नागरिकांवरील कराचे ओझे कमी होईल असे पंतप्रधान म्हणाले. तर नागरिकांच्या आशीर्वादाने जीएसटी सुधारणेचा कार्यक्रम सुरुच राहिल असे मोठे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले.

पुन्हा स्वदेशीचा नारा

पंतप्रधानांनी जगभरातील कंपन्यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. त्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भारतात अनेक ओपन प्लेटफॉर्म्स तयार करण्यात आले आहेत. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. यामध्ये युपीआय, आधार, डिजीलॉकर, ओएनडीसी या सर्वांना संधी देते. प्लेटफॉर्म्स फॉर ऑल, प्रोग्रेस फॉर ऑल हा या प्लॅटफॉर्म्सचा मंत्र आहे. जगभरात मोठी उलाढाल होत आहे आणि अनिश्चितता आहे. तरीही भारत वेगाने पुढे जात असल्याचे मोदी म्हणाले.

मोदी यांनी स्वदेशीवर जोर दिला आहे. भारताला आत्मनिर्भर व्हावेच लागेल. प्रत्येक वस्तू भारतात तयार व्हावी यासाठी भारत प्रयत्न करत आहे. भारत या वस्तू तयार करणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. भारतात केंद्र सरकार एक व्हायब्रंट डिफेन्स सेक्टर विकसीत करत आहे. आता प्रत्येक वस्तूवर मेड इन इंडियाचा शिक्का असेल, अशी इकोसिस्टिम तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली.