56th GST Council Meeting Updates : महागड्या इलाजाची नको चिंता! GST परिषदेचा मोठा फैसला; आरोग्य आणि जीवन विम्याबाबत मोठा निर्णय

Life And Health Insurance GST Free : रुग्ण आणि नातेवाईकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात जीएसटीने उपचार महागले होते. त्यावर आता सरकारने जालीम उपाय केला आहे.

56th GST Council Meeting Updates : महागड्या इलाजाची नको चिंता! GST परिषदेचा मोठा फैसला; आरोग्य आणि जीवन विम्याबाबत मोठा निर्णय
विमाधारकांना मोठा दिलासा
| Updated on: Sep 04, 2025 | 11:22 AM

GST on Life and Health Insurance: केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी रात्री GST 2.0 अंतर्गत अनेक महत्त्वाच्या जीएसटी सुधारणांची घोषणा केली. त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठी आनंदवार्ता आणली. वैयक्तिक जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींच्या प्रीमियमवर जीएसटी लागत होता. आता हा जीएसटी हटवण्यात आला आहे. दोन्ही विमा पॉलिसी आता जीएसटी मुक्त असतील. सध्याच्या काळात आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवर 18 टक्क्यांच्या दराने जीएसटी वसूल करण्यात येतो. आता जीएसटी रिफॉर्म्स अंतर्गत कोणताच जीएसटी आकारण्यात येणार नाही. हा नियम या महिन्याच्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्त होईल विमा

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी GST 2.0 अंतर्गत याविषयीचा फैसला केला. त्यामुळे आता विमा पॉलिसीही किफायतशीर आणि स्वस्त होईल. विमा क्षेत्र व्यापक होईल. अधिकाधिक लोक याचा फायदा घेतील. व्यक्तिगत युलिप प्लॅन, कुटुंब पॉलिसी आणि टर्म प्लॅन जीएसटी मुक्त झाले आहेत. टर्म लाईफ, युनिक लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन, एंडोमेंट प्लॅन हे सर्व विमा पॉलिसीअंतर्गत येतात. या सर्व बदलासह जीएसटी शून्य होईल. तर विमा पॉलिसी नुतनीकरणारही जीएसटी लागणार नाही.

आता केवळ हप्ताच द्यावा लागणार

जीएसटी सुधारणांमुळे (GST Reforms) आता ग्राहकांना केवळ त्यांचा विमा हप्ताच जमा करावा लागेल. त्यावर जीएसटी भरावा लागणार नाही. त्यासाठी वेगळा कर द्यावा लागणार नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, यामुळे पॉलिसीच्या प्रीमियममध्ये जवळपास 15 टक्क्यांपर्यंत कपात होईल. म्हणजे एका हजारांवर 180 रुपये वाचतील. तर मोठ्या प्रीमियमवर ही रक्कम लक्षणीय असेल. ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होईल. तर जीएसटी मुक्त पॉलिसी स्वस्त झाल्याने अधिकाधिक लोक या पॉलिसी खरेदी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या विमाधारकाला 100 रुपयांच्या प्रीमियमवर 18 टक्क्यांच्या दराने 118 रुपये जमा करावे लागतात. आता जीएसटी मुक्त पॉलिसीमुळे प्रीमियम केवळ 100 रुपयेच असेल. जीएसटी परिषदेची बैठक कालपासून सुरू झाली होती. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जीएसटी सुधारणेची घोषणा केली होती. त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांसह ऑटो आणि इतर क्षेत्रांना झाला आहे. मध्यम आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.