
HCL Tech चे संस्थापक शिव नाडर यांनी महिला दिनाचे औचित्य साधत आपल्या कन्या रोशनी नाडर हिला एक अनोखे गिफ्ट दिले आहे. ज्याची लोक केवळ अपेक्षाच करीत असतात. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी देखील त्यांची कन्या इशा हिला असे गिफ्ट अद्याप देऊ शकलेले नाहीत. वाचा ही बातमी….
एचसीएल टेक्नॉलॉजी देशातील टॉप-5 टेक कंपन्यापैकी एक आहे. ही देशाची सर्वात मोठी प्रमोटर बॅक्ड कंपन्यांपैकी एक आहे. शिव नाडर हळूहळू कंपनीचा सर्व सूत्रे त्यांची कन्येच्या हातात सोपवत आहेत. त्यांच्या कन्या रोशनी नाडर एचसीएलच्या दोन प्रमोटर कंपन्यात मोठी हिस्सेदारी गिफ्ट दिले आहे.
शिव नाडर यांनी आपल्या उत्तराधिकारी योजनेंतर्गत एचसीएल टेकच्या दोन प्रमोटर कंपन्या ‘वामा सुंदरी इंव्हेस्टमेंट’ आणि ‘एचसीएल कॉर्पोरेशन’ मध्ये आपली 47% हिस्सा रोशनी नाडर मल्होत्रा हीला गिफ्ट डीड च्या अंतर्गत ट्रान्सफर केला आहे. यानंतर आता शिव नाडर यांची स्वत:ची हिस्सेदारी घटून आता केवळ 4 टक्के राहीली आहे.
एवढेच नाही तर कंपन्यात रोशनी नाडर मल्होत्रा यांची हिस्सेदारी वाढून आता 57.33 टक्के झाली आहे. तसेच बोर्डाचे निर्णय घेण्यातही त्यांची व्होटींग पॉवर देखील वाढली आहे. डिसेंबर 2024 च्या डेटा नुसार या दोन प्रमोटर ग्रुप कंपन्यांची एचसीएल टेक्नॉलॉजीसमध्ये एकूण हिस्सेदारी 44.34 टक्के आहे. याशिवाय शिव नाडर आणि रोशनी नाडर मल्होत्रा देखील एचसीएल टेक्नॉलॉजीसच्या प्रमोटर्स आहेत. त्यांच्या जवळ एचसीएल टेक मध्ये 1 टक्के थेट हिस्सेधारी देखील आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देखील आपल्या तीन मुलांसाठी उत्तराधिकारी योजना बनविली आहे. यात इशा अंबानी हिला रिटेल, आकाश अंबानी याला टेलीकॉम आणि अनंत अंबानी यााल एनर्जी बिझनस सोपविला आहे. परंतू आतापर्यंत त्यांनी आपल्या बिझनसची संपूर्ण वाटणी मुलांमध्ये केलेली नाही. तसेच शेअर होल्डींगची देखील वाटणी केलेली नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रमोटर ग्रुपची भागीदारी 50 टक्क्यांहून अधिक आहे.परंतू वैयक्तिकरित्या कोकिला बेन यांच्याजवळ 0.24 टक्के आणि मुकेश, नीता, इशा, आकाश आणि अनंत प्रत्येकाजवळ 0.12 टक्के हिस्सेदारी या कंपन्यात आहे. तेवढेच व्होटींग राईट त्यांच्याकडे आहेत.