HDFC बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. (HDFC Bank revises FD rates)

HDFC बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर
HDFC Bank
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:40 PM

मुंबई : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. HDFC ने एफडी (FD) च्या व्याजदरात बदल केला आहे. या नव्या बदलानुसार एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज देत आहे. तर 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीतील मुदत ठेवींवर 2.50 ते 5.50 टक्के व्याज देते. (HDFC Bank revises fixed deposit rates Check latest FD rates here)

त्याशिवाय 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीसाठी व्याज दर 3.5 टक्के इतका आहे. तर 6 महिने 1 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीतील मुदत ठेवींवर 4..4 टक्के व्याजदर असतो. तसेच एका वर्षात Mature झालेल्या एफडीवरील व्याजदर हा 4.9 टक्के इतका असतो. HDFC बँकेच्या वेबसाईटनुसार, हे नवीन दर येत्या 21 मे 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. तसेच 1 वर्ष आणि 2 वर्षातील मुदत ठेवींवर 4.9 टक्के व्याज दर उपलब्ध आहे.

नवीन व्याजदर

तसेच 2 ते 3 वर्षात Mature होणाऱ्या एफडीवरील व्याज दर 5.15 टक्के इतका आहे. त्याशिवाय 3 ते 5 वर्षातील एफडीवरील व्याजदर 5.30 टक्के इतका असेल. तसेच 5 वर्ष ते 10 वर्षाच्या मुदत ठेवींवर बँक 5.30 टक्के व्याज देत आहे. HDFC बँकेने यापूर्वी 13 नोव्हेंबर 2020 रोजी व्याजदरात बदल केला होता.

7 दिवस ते 14 दिवस- 2.50 %

15 दिवस ते 29 दिवस – 2.50%

30 दिवस ते 45 दिवस – 3%

46 दिवस ते 60 दिवस – 3%

61 दिवस ते 90 दिवस – 3%

91 दिवस ते 6 महिने- 3.5%

6 महीना 1 दिवस ते 9 महीना- 4.4%

9 महिने 1 दिवस < 1 वर्ष- 4.4%

1 वर्ष- 4.9%

1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्ष – 4.9%

2 वर्ष 1 दिवस से 3 वर्ष- 5.15%

3 वर्ष 1 दिवस से 5 वर्ष- 5.30%

5 वर्ष 1 दिवस से 10 वर्ष- 5.50%

तसेच सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंटपेक्षा अधिक व्याज मिळतो. यात बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 3 टक्के ते 6.25 टक्के व्याज देते.

दरम्यान HDFC बँकेसह अॅक्सिस बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांसह काही बँकांनी मे महिन्यातील मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे.  (HDFC Bank revises fixed deposit rates Check latest FD rates here)

संबंधित बातम्या : 

सरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून मोठी पगारवाढ, महिन्याचा पगार किती हजारांनी वाढणार?

Petrol Diesel Price | मुंबई, पुण्यासह अनेक शहरात पेट्रोलचं शतक, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

Gold Price Today : सोने महिनाभरात 2000 रुपयांनी महागले, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नगर, कोणत्या शहरात दर किती?

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.