होमलोन घेणाऱ्यांच्या संख्येत भर! HDFCच्या नफ्यात 11% वाढ, आर्थिक तिमाही अहवाल जाहीर

एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (असेट अंडर मॅनेजमेंट) गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांच्या वाढीसह 6.2 लाख कोटींवर पोहोचली आहे.

होमलोन घेणाऱ्यांच्या संख्येत भर! HDFCच्या नफ्यात 11% वाढ, आर्थिक तिमाही अहवाल जाहीर
होम लोन
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 7:09 PM

नवी दिल्ली : भारतातील आघाडीची गृहवित्त कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (HDFC) आर्थिक तिमाहीची (Q3 Results) आकडेवारी जाहीर केली आहे. एचडीएफसीचा नफा 11 टक्के वाढीसह 3260.7 कोटींवर पोहोचला आहे. गृह कर्जासाठीच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत आहे आणि नव्याने कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्व प्रकारच्या घरांसाठी गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे एचडीएफसीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गृह कर्ज श्रेणीतील (HOME LOAN CATEGORY) तेजीमुळं एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (असेट अंडर मॅनेजमेंट) गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांच्या वाढीसह 6.2 लाख कोटींवर पोहोचली आहे. आर्थिक तिमाही अहवालात सर्वोत्तम कामगिरीनंतरही एचडीएफसीच्या संपत्तीच्या गुणवत्तेत मात्र घसरण दिसून आली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा एनपीए 2 टक्क्यांनी वाढला आहे.

शेअर बाजारातील कामगिरी

आर्थिक तिमाही अहवालानंतर एचडीएफसीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. स्टॉक 1.87 टक्क्यांच्या वाढीसह सर्वोच्च स्तर नजीक 2612वर बंद झाला. आज शेअर बाजाराचा सर्वोच्च स्तर 2623 होता. संपूर्ण शेअर बाजाराचा व्यवहार ग्रीन सिग्नलमध्ये होता.

आर्थिक तिमाहीची आकडेवारी दृष्टीक्षेपात:

आर्थिक तिमाही अहवालात सर्वोत्तम कामगिरीनंतरही एचडीएफसीच्या संपत्तीच्या गुणवत्तेत मात्र घसरण दिसून आली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा एनपीए 2 टक्क्यांनी वाढला आहे. निव्वळ एनपीए 10341 कोटींवरुन 12149 कोटींवर पोहोचले आहे. निव्वळ एनपीएतीपैकी 2746 कोटी थकित 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीचे आहे.

स्वप्नातल्या घराला ‘आर्थिक ’ आधार:

एच.डी.एफ.सी. बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड) ही एक गृहनिर्मितीसाठी कर्ज देणारी वित्तीय संस्था आहे. एचडीएफसी कडून दोन प्रकारची कर्जे देण्यास सुरुवात केली. आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांसाठी एचआयएल (गृह सुधारणा कर्ज) आणि एचईएल (गृह विस्तार कर्ज). एचडीएफसीने बँकिंग सेवा देण्यासाठी एचडीएफसी बँक सुरू केली.

रिझर्व्ह बँकेची मोहोर:

सार्वजनिक वित्तीय व्यवस्थेतील तीन बँकाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डी-एसआयबी यादीत समावेश करण्यात आला आहे. बँकिंग व्यवहारातील पारदर्शकता आणि ठेवींची सुरक्षितता आदी निकषांवर रिझर्व्ह बँकेकडून डी-एसआयबी सूची घोषित केली जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक सहित एचडीएफसी बँकेचा समावेश होता. वर्ष 2021 साठी डॉमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँक (डी-एसआयबी) घोषित करण्यात आली आहे. एचडीएफसीचा समावेश बकेट-1 मध्ये करण्यात आला आहे. दोन बँकानंतर समावेश होणारी एचडीएफसी तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरली आहे.

संबंधित बातम्या :

Share Market : शेअर बाजारात पुन्हा फॉर्मात? सेंन्सेक्समध्ये 695 अंकाची वाढ! बँकिंग स्टॉक्सही वाढले

Budget 2022 | स्वस्त नाही, वजनाने हलके झाले Gas Cylinder, कंपोझिट गॅस सिलिंडर म्हणजे काय?

Union Budget 2022 : साडी में साडी हँडलूमची सिल्क साडी! बजेटपेक्षाही चर्चा अर्थमंत्र्यांच्या साडीची! किंमत किती?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.