AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार

बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय आहेत. बँकांमध्ये आवर्ती ठेव योजना, मुदत ठेव, शेअर बाजार, म्युच्यु्अल फंड, डिजिटल गोल्डसह विविध पर्याय आहेत. पण विना जोखीम चांगला परतावा देणारी केंद्रीय रिझर्व्ह बँकेची ही योजना तुम्हाला माहिती आहे का?

FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार
| Updated on: Aug 25, 2026 | 9:08 PM
Share

RBI Floating Rate Saving Bonds Scheme: गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. जोखीमयुक्त आणि विना जोखीम असे त्यात प्रमुख भाग आहे. विविध गुंतवणूक योजनांमध्ये एफडी, आवर्ती ठेव योजना, पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय पेन्शन योजनांचा समावेश होतो. काही जण शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड, क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करतात. या जोखमेच्या गुंतवणूक योजना आहे. पण बँक एफडीपेक्षा अधिक परतावा देणारी केंद्रीय रिझर्व्ह बँकेची ही योजना तुम्हाला माहिती आहे का?

RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स योजना

भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा विशेष बचत योजना राबवते. या योजनेला फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड योजना म्हणतात. यामधील व्याजदर हा निश्चित नसतो. तो बाजारातील परिस्थितीनुसार बदलतो. या योजनेला आरबीआयचे संरक्षण आहे. केवळ भारतीय नागरिक आणि हिंदू कुटुंब यामध्ये गुंतवणूक करू शकते. अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही.

व्याजदराची अशी होते गणना

NSC आणि इतर बचत योजनांप्रमाणेच बदलतो. हा व्याजदर NSC व्याजदराशी संलग्नित आहे. तो नेहमीच एनएससी दराच्या +0.35 टक्के असतो. सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजे 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी व्याजदराचा आढावा घेते आणि नवीन व्याजदर जाहीर करते. या योजनेतील व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी संबंधीत गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या बाँडची एकूण मुदत 7 वर्षे इतकी आहे. या योजनेत गुंतवणूक करताना लॉक-इनचे नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे.

फ्लोटिंग रेट बाँड्स कुठं करायचा खरेदी?

RBI Floating Saving Bonds देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका अथवा एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक वा इतर प्रमुख निवडक खासगी बँकांच्या शाखांमधून अथवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन हे बाँड खरेदी करता येतात. बाँड लेजर अकाऊंटच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने हे बाँड जमा केले जातात. पण या गुंतवणुकीवर कर्ज मिळवता येत नाही.

Follow Us