AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदानी ग्रुपला हादरवणारा हिंडनबर्गचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात, जनहित याचिकेत काय केली मागणी

आयपीसी कलम ४२० व १२० नुसार शॉर्ट सेलर अँडरसन यांच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अँडरसन यांनी भारतीय संस्थांविरोधात कट रचल्याचा आरोपही याचिकेत केला आहे.

आदानी ग्रुपला हादरवणारा हिंडनबर्गचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात, जनहित याचिकेत काय केली मागणी
Image Credit source: supreme_court
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 04, 2023 | 1:52 PM
Share

मुंबई : अमेरिकेतून हिंडेनबर्ग नावाचे वादळ येते अन् भारतात गौतम अदानींचे संपूर्ण साम्राज्य हादरून जाते. संसदेपासून शेअर मार्केटपर्यंत फक्त अदानींचीच चर्चा होत आहे. 10 दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता 21 व्या क्रमांकावर गेले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत गुंतवणूकदारांचे नुकसान भरुन देण्याची मागणी केली आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. हिंडेनबर्ग कंपनीचे मालक आणि संस्थापक नॅथन अँडरसन विरोधात कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. वकील मनोहरलाल शर्मा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. शॉर्ट सेलर अँडरसन तसेच त्यांच्या सहकार्यांनी लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. त्यांच्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन देण्याची मागणी केली आहे.

याचिकेनुसार, आयपीसी कलम ४२० व १२० नुसार शॉर्ट सेलर अँडरसन यांच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अँडरसन यांनी भारतीय संस्थांविरोधात कट रचल्याचा आरोपही याचिकेत केला आहे.

काय आहे हिंडनबर्ग

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने (Nathan Anderson) 2017 मध्ये केली होती. ही एक आर्थिक संशोधन करणारी संस्था (Financial Research Firm) आहे. इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते. या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही रंजक इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंकपासून आपल्या करियरला सुरुवात केली. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे. मार्कपोलोस हे सुद्धा एक विश्लेषक आहे. त्यांनी बर्नी मेडॉफ (Bernie Madoff) यांच्या एका योजनेचा भांडाफोड केला होता.

अदानी समूहासाठी चांगली बातमी

शुक्रवारी Adani Enterprises चा शेअर 35 टक्के घसरला. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 24 जानेवारीला 3,442 रुपये होता तो शुक्रवारी 3 फेब्रवारी रोजी 1,017 रुपयांवर आला होता. परंतु एका चांगल्या बातमीनंतर तो शेअर पुन्हा 50 टक्के वधारत 1586 वर बंद झाला. अदानी समूहासाठी चांगली बातमी फिच रेटिंगकडून आली. फिच रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की अदानी समूहाच्या कंपन्यांच्या किंवा सिक्युरिटीजच्या रेटिंगवर सध्या कोणताही परिणाम होणार नाही. अदानी समूहाच्या रोख प्रवाहाच्या अंदाजात कोणताही मोठा बदल होणार नाही, असे फिच रेटिंगने स्पष्ट केले. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सचा ट्रेंड बदलला.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?