AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक वर्षी कापला जातो तुमचा खिसा; बँकेचे हे चार्जेस माहिती आहेत का?

Bank Service Charges | बँक सेवा शुल्काच्या नावाखाली आपल्या खात्यातून किती रक्कम वळती करतात माहीत आहे का? बँका अनेक प्रकारचे चार्जेस आकारतात. प्रत्येक महिन्याला, वर्षाकाठी बँका खात्यातून शुल्क कपात करतात. बँक फार कमी सेवा मोफत देतात. बँका सेवेच्या नावाखाली ग्राहकांची लूट करतात. जाणून घ्या कोणत्या सेवेसाठी शुल्क कपात होते.

प्रत्येक वर्षी कापला जातो तुमचा खिसा; बँकेचे हे चार्जेस माहिती आहेत का?
| Updated on: Dec 16, 2023 | 9:36 AM
Share

नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : बँकिंग सेवेचा प्रत्येक जण आज वापर करतो. जनधन योजनेमुळे आणि पोस्ट पेमेंट बँकेमुळे ग्रामीण भागातही बँकिंग सुविधा पोहचत आहेत. बँका ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा देतात. बँका सेवा शुल्क आकारतात. दरवर्षी अथवा दरमहा असे त्याचे स्वरुप असते. यामध्ये एसएमए सेवा, पैसे हस्तांतरण, धनादेश वटवणे, एटीएममधून पैसे काढणे वा इतर दुसऱ्या प्रकारच्या सेवांसाठी ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करण्यात येते. बँकेच्या सर्वच सेवा मोफत मिळत नाही. बँक या सेवेपोटी ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारते. तुम्हाला माहिती आहे का, किती प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत? वर्षाकाठी तुमच्या खात्यातून कोणत्या सेवेसाठी शुल्क कपात होते?

  1. रक्कम हस्तांतरण – प्रत्येक बँक रक्कम हस्तांतरण करण्याची सुविधा देते. एका मर्यादेनंतर रक्कम हस्तांतरीत करायची असेल तर त्यासाठी सेवा शुल्क आकारते. साधारणपणे सरकारी बँका या सेवासाठी 20 ते 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारु शकतात.
  2. कमीतकमी शिल्लक – मिनिमम बॅलन्स हा लूटीसाठीचा नवीन प्रकार समोर आणण्यात आला आहे. तुमच्या खात्यात एक आमूक रक्कम नसेल तर बँका, बॅलन्स नसल्याचे कारण समोर करत मुळातच कमी असलेल्या रक्कमेतून दरमहा रक्कम कपात करतात. ही सर्वात मोठी लूट आहे. ग्राहकांचा खिसा कापण्याचे हे सर्वात सोपे साधन आहे.
  3. IMPS शुल्क – सर्व बँका ग्राहकांना NEFT आणि RTGS व्यवहार मोफत मिळतो. मात्र अनेक बँका IMPS व्यवहारावर शुल्क आकारतात. हे शुल्क 1 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत असते.
  4. धनादेश वटवणे – जर तुमचा धनादेश 1 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला बँकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. पण त्यापेक्षा अधिक रक्कमेचा चेक असेल तर शुल्क द्यावे लागते. हे शुल्क 150 रुपयांपर्यंत असते.
  5. ATM व्यवहार – एटीएममधून रक्कम काढण्यासाठी बँकांनी काही वर्षांपूर्वी एक मर्यादा निश्चित केली. तोपर्यंत रक्कम काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यानंतरच्या व्यवहारासाठी 20-50 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते.
  6. SMS शुल्क – तुमच्या खात्यातील व्यवहारासंबंधीची माहिती अपडेट करण्यासाठी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच अलर्ट मॅसेज यासाठी बँका एसएमएस शुल्क आकारतात.
  7. कार्ड बदल – जर तुमचे डेबिट कार्ड हरवले अथवा दुसरे कार्ड घ्यायचे असेल तर बँकांना शुल्क द्यावे लागते. हे शुल्क 50 रुपये ते 500 रुपयांपर्यंत असते. प्रत्येक बँकेने याविषयीचे शुल्क निर्धारीत केले आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.