तुर्कस्तान-पाकिस्तानमधील ट्रेड किती? गौतम अदानी यांनी त्यापेक्षा जास्त एका दिवसात कमावले

Gautam Adani Net Worth Jumps: तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सन 2024 मध्ये 1.4 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये सोमवारी एका दिवसातच 1.72 अब्ज डॉलर वाढ झाली.

तुर्कस्तान-पाकिस्तानमधील ट्रेड किती? गौतम अदानी यांनी त्यापेक्षा जास्त एका दिवसात कमावले
Gautam Adani Net Worth Jumps
| Updated on: May 27, 2025 | 12:40 PM

ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कस्तानने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलरपर्यंत पोहचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सन 2024 मध्ये दोन्ही देशांचा व्यापार 1.4 अब्ज डॉलर होता. भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये सोमवारी 1.72 अब्ज डॉलर वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, अदानी यांची नेटवर्थ आता 82.3 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 20 व्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 3.64 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.

तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांचे संबंध अधिक दृढ होत आहे. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना प्रमोशन मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ रविवारी तुर्कस्तान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात भारताविरोधात मदत केल्याबद्दल तुर्कस्तानचे त्यांनी अभिनंदन केले.

तुर्कस्तान आणि पाकिस्तानचे संबंध सुधारत असताना भारताने मोठी झेप घेतली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे. तसेच ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, आशिया आणि भारताच्या सर्वाधिक श्रीमंतांच्या संपत्तीत यावर्षी 13 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.

सोमवारी जगातील श्रीमंतांची यादी आली. त्या यादीत टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत 13 जणांच्या नेटवर्थमध्ये घसरण झाली आहे. सर्वाधिक नुकसान फेसबुकची पेरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना झाला आहे. त्यांच्या संपत्तीत 3.29 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. तसेच सर्वाधिक फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना झाला आहे. त्यांच्या संपत्तीत 2.35 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. ते आता 104 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर आहे.

जगातील टॉप 10 श्रीमंत कोण?

जगातील श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क प्रथम क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 374 अब्ज डॉलर आहे. दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेजोस आहे. त्यांच्याकडे 222 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मार्क झुकरबर्ग (222 अब्ज डॉलर) तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन (181 अब्ज डॉलर) तर पाचव्या क्रमांकावर बिल गेट्स (173 अब्ज डॉलर) आहेत. गुंतवणूकदार वॉरेन बफे (157 अब्ज डॉलर) सहावा, स्टीव्ह बालमर (156 अब्ज डॉलर) सातवा, लॅरी पेज (153 अब्ज डॉलर) आठवा, बर्नार्ड अरनॉल्ट (152 अब्ज डॉलर) नववा आणि सर्गेई ब्रिन (143 अब्ज डॉलर) दहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये एकही भारतीय नाही.