Mukesh Ambani पुन्हा आशियाचे ‘किंग’! अदानींना झटका, श्रीमंतांच्या यादीत कोण हुकमी एक्का

Hurun Global Rich List 2026: जगातील श्रीमंत लोकांची यादी समोर आली आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारतीय उद्योगपतींनी पुन्हा एकदा मोठी भरारी घेतली आहे. भारतात अब्जाधीशांची संख्या वाढून 308 इतकी झाली. जागतिक पातळीवर भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

Mukesh Ambani पुन्हा आशियाचे किंग! अदानींना झटका, श्रीमंतांच्या यादीत कोण हुकमी एक्का
मुकेश अंबानी, गौतम अदानी
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 07, 2026 | 3:59 PM

Mukesh Ambani is the Richest Person of Asia: जगातील सर्वात श्रीमंत लोकांची नवीन यादी समोर आली आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार भारतात अब्जाधिशांची संख्या तेजीने वाढत आहे. आता देशात एकूण 308 अब्जाधिश आहेत. त्यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर चीन आणि दुसर्‍या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. या अहवालानुसार, जागतिक स्तरावर पहिल्यांदाच अब्जाधिशांची संख्या 4000 पेक्षा अधिक झाली आहे. यावर्षी जगात एकूण 4020 अब्जाधिशांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा 578 नी वाढला आहे.

भारतात वाढली अब्जाधिशांची संख्या

या अहवालानुसार, भारतात यंदा 24 नवीन अब्जाधीश जोडल्या गेले. तर 57 नवीन लोक पहिल्यांदा यादीत सहभागी झाले आहेत. विविध क्षेत्रात झपाट्याने श्रीमंत वाढत आहेत. श्रीमंतांचा एक वर्ग तयार होत आहे. भारतीय अब्जाधिशांची एकूण संपत्तीत वाढ होऊन जवळपास 112.6 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा जवळपास 10% अधिक आहे. आरोग्य, औद्योगिक उत्पादनं आणि कंझ्युमर गुड्स सारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महसूल आणि नफ्याची उलाढाल नोंदवली गेली आहे.

मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अहवालानुसार, मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 9.8 लाख कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी पेक्षा त्यांच्या संपत्तीत एकूण 9% भर पडली आहे. तर गौतम अदानी हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीत एकूण 14% टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 7.5 लाख कोटी रुपये इतकी आहे. अमेरिकेतील त्यांच्याविरोधातील खटले आणि इतर वार्तांमुळे शेअर्समध्ये चढउतार दिसून येत आहे.

भारतातील टॉप-10 सर्वात श्रीमंत

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी

मुकेश अंबानी आणि कुटुंब – 9.8 लाख कोटी

गौतम अदानी आणि कुटुंब – 7.5 लाख कोटी

रोशनी नादर मल्होत्रा आणि कंपनी – 3.2 लाख कोटी

सायरस एस.पूनावाला आणि कुटुंब- 3 लाख कोटी

कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब – 2.5 लाख कोटी

दिलीप सांघवी – 2.3 लाख कोटी

अजीम प्रेमजी आणि कुटुंब – 2.3 लाख कोटी

नीरज बजाज आणि कुटुंब – 2.2 लाख कोटी

अशोक पी. हिंदुजा आणि कुटुंब – 2.2 लाख कोटी

राधाकिशन दमानी आणि कुटुंब – 1.5 लाख कोटी

Follow Us