धूम्रपान, मद्यपानाची नाही सवय, तरीही विमा कंपनीने नाकारला मेडिकल क्लेम? मग हे तर नाही कारण?

Medical Claim: अनेकदा सिगारेट ओढत नाही. तंबाखू चोळत नाही आणि दारूला तर हातही लावत नाही असे जाहीर करूनही विमा कंपन्या क्लेम नाकारतात. मंजुरीचा दावा फेटाळतात. काय आहे त्यामागील कारण?

धूम्रपान, मद्यपानाची नाही सवय, तरीही विमा कंपनीने नाकारला मेडिकल क्लेम? मग हे तर नाही कारण?
मेडिकल क्लेम, आरोग्य विमा
| Updated on: Nov 22, 2025 | 3:17 PM

Health Insurance: कोरोना आल्यानंतर आरोग्य सेवा, आरोग्य तपासणी आणि आरोग्य विम्याविषयी नागरिक अत्यंत जागरूक झालेले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांना तर एकदम सुगीचे दिवस आले आहेत. आजकाल अनेक जण स्वतःहून त्यांच्याकडून आरोग्य विमा खरेदी करत असल्याने या क्षेत्राला महत्त्व आले आहे. पण आरोग्य विमा खरेदी केला म्हणजे प्रत्येक दुखण्याला आणि आजाराला लागलीच पैसा मिळतो या भ्रमात तुम्ही असाल तर मग मात्र अवघड आहे. कारण विमा घेताना तुम्ही त्यांच्या अटी आणि शर्ती वाचल्या नसल्याचेच हे द्योतक आहे.

धूम्रपान-मद्यपानाविषयीचा काय आहे तो नियम?

धूम्रपान, मद्यपानामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, पक्षघात, हृदयविकार असे अनेक अनेक आजार बळवतात. त्यामुळे विमा घेताना कंपन्या तुमच्याकडून त्याविषयीची माहिती घेतात. त्याविषयीचे घोषणापत्र, डिक्लेरेशन लिहून घेतात. काही आरोग्य विमा कंपन्या तर आरोग्याची तपासणी झाल्याशिवाय विमा संरक्षण देत नाहीत. जे विमाधारक अगोदर धूम्रपान करते होते. मद्यपान करते होते. अथवा सध्याही अधूनमधून धूम्रपान आणि मद्यपान करतात त्यांनी जर ही बाब लपवली आणि पुढे रुग्णालयात भरती झाल्यानंतर तपासणीत ही बाब समोर आली तर मग तुमचा आवाढव्य खर्च आरोग्य विमा कंपन्या नाकारतात. तुमचा दावा नामंजूर होतो.

तर मग विमा कंपन्यांवर जबाबदारी

आरोग्य विमा खरेदी करताना तुमची वैयक्तिक आरोग्य तपासणी, कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घेणे आणि त्याची माहिती देणे तुमच्या फायद्याचे ठरते. तुम्हाला धूम्रपानाची आणि मद्यपानाची सवय असेल तर त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही विमा कंपनीला देणे फायद्याचे ठरते. जर तुम्ही याविषयीचे लिखीत घोषणापत्र करून दिले आणि कंपनीने तुम्हाला विमा दिला तर पुढील खर्चाची जबाबदारी ही विमा कंपनीची असते. ती तुमचा या सवयी लपवल्या म्हणून विम्याचा दावा फेटाळू शकत नाही.

विम्या कंपन्यांची ‘शाळा’

तुम्ही जर धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी आणि आजारपण लपवले नाही तर आरोग्य विमा कंपन्या आरोग्य विमा विक्री करताना एक शाळा करतात. ते सर्वसामान्यापेक्षा अधिक दराने तुम्हाला आरोग्य विम्याची विक्री करतात. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेला विमा हा इतरांपेक्षा महाग असतो. अशावेळी केवळ धूम्रपान अथवा मद्यपान करता म्हणून विमा कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकत नाहीत.