AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बड्या सरकारी बँकेचं खासगीकरण होणार? लवकरच मोठी घोषणा; महत्त्वाची अपडेट समोर!

IDBI Bank Sale : गेल्या जवळपास पाच वर्षांपासून IDBI या सरकारी बँकेचे खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता लवकरच या बँकेच्या विक्रीचे व्यव्हार पूर्ण होणार आहे.

मोठी बातमी! बड्या सरकारी बँकेचं खासगीकरण होणार? लवकरच मोठी घोषणा; महत्त्वाची अपडेट समोर!
idbi bank privatisationImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 6:02 PM
Share

देशाच्या बँकिंग क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या जवळपास पाच वर्षांपासून IDBI या सरकारी बँकेचे खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रत्येक वेळी या प्रक्रियेत काही ना काही अडथळे निर्माण झाले. आता मात्र IDBI बँकेच्या खासगीकरणाची आणि धोरणात्मक निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकार आणि LIC हिस्सेदारी विकणार

केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC मिळून IDBI बँकेतील आपली 60.72 टक्के हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहेत. या हिस्सेदारीच्या खरेदीसाठी कॅनडाची फेअरफॅक्स फायनान्सियल होल्डिंग्स कंपनी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने बँकेचे मूल्यांकन सुमारे 53,000 कोटी रुपये गृहीत धरून सुधारित प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. 2021 पासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत नियामक मंजुरी आणि विविध प्रक्रियात्मक कारणांमुळे अनेकदा विलंब झाला. मात्र, आता सरकार या व्यवहाराच्या अधिकृत घोषणेची योग्य वेळ ठरवण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सरकार लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत

IDBI बँक खरेदी करण्यासाठी कॅनडातील अब्जाधीश प्रेम वत्सा यांच्या मालकीची फेअरफॅक्स फायनान्सियल होल्डिंग्स कंपनी सर्वाधिक बोली लावणारी कंपनी ठरल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला या व्यवहारात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. कारण सुरुवातीच्या बोली सरकारने निश्चित केलेल्या राखीव किमतीपेक्षा कमी होत्या. त्यानंतर बोलीदारांना आपले प्रस्ताव सुधारण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार Fairfaxने आपल्या प्रस्तावात सुधारणा केली असून, हा प्रस्ताव आता प्रति शेअर सुमारे 81 रुपयांच्या आसपास असल्याचे समजते. या दरानुसार IDBI बँकेतील सरकार आणि LICच्या 60.72 टक्के हिस्सेदारीचे एकूण मूल्य सुमारे 53,000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

IDBI बँकेत सरकार आणि LICची किती हिस्सेदारी?

केंद्र सरकार IDBI बँकेतील आपली 30.48 टक्के हिस्सेदारी, तर LIC आपली 30.24 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. दोघांची मिळून एकूण 60.72 टक्के हिस्सेदारी विक्रीसाठी उपलब्ध आहे. IDBI बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती. नियामक मंजुरी आणि इतर प्रक्रियात्मक कारणांमुळे या व्यवहाराला अनेकदा विलंब झाला. मात्र, Fairfaxकडून आलेली सुधारित बोली आणि कंपनीची सातत्यपूर्ण स्वारस्य यामुळे निर्गुंतवणुकीची प्रक्रिया आता पुढे सरकत असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात