AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : आज औरंगाबादकरांच्या खिशाला झळ! एका लिटर पेट्रोल इतक्या रुपयांनी महागले

Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या भावात सातत्याने नरमाई असतानाही देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाहनधारकांना कसलाही दिलासा मिळालेला नाही. गुरुवारी सकाळी भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. त्यात काही राज्यात पेट्रोलसह डिझेलचा भाव वधारला. त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात पेट्रोल महागले आहे.

Petrol Diesel Price : आज औरंगाबादकरांच्या खिशाला झळ! एका लिटर पेट्रोल इतक्या रुपयांनी महागले
आजचा भाव काय
| Updated on: Mar 09, 2023 | 8:29 AM
Share

नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने नरमाई आली आहे. या किंमती चढउतार होत असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून किंमतींनी मोठी उसळी घेतलेली नाही. गुरुवारी सकाळी भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) जाहीर केले. त्यात काही राज्यात पेट्रोलसह डिझेलचा भाव वधारला.आज सकाळी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रातील काही शहरात इंधनात दरवाढ झाली. भाव वाढ लक्षणीय नसली तरी त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. राज्यातील औरंगाबाद शहरात तर पेट्रोलच्या किंमतीत त्यामानाने जास्त दरवाढ दिसून आली. इतर शहरात 5 ते 55 पैशांची तफावत पहायला मिळत आहे. पण औरंगाबाद शहरात किंमतींनी आतापर्यंतचा रेकॉर्ड तोडला आहे.

रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल, संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांना प्रत्येक बॅरलमागे 2 डॉलरचा फायदा झाला आहे.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) मध्ये पुन्हा घसरण झाली. अमेरिकन तेलाचा भाव आता 76.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) किंमती पण घसरल्या आहेत. कालच्या 83.29 दरापेक्षा आज 82.70 डॉलर प्रति बॅरलवर विक्री होत आहे. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज भाव जाहीर केले. आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाच्या भावानंतर या किंमती जाहीर करण्यात येतात. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या भावात आज सर्वात कमी तफावत दिसून आली. एक पैशांची ही तफावत आहे. तर इतर शहरात 5 ते 95 पैशाांपर्यंत भावात फरक दिसून आला. पण औरंगाबादकरांना सर्वाधिक फटका बसला आहे. औरंगाबाद शहरात पेट्रोलचा भाव 1.30 रुपयांनी वाढून 108 रुपये लिटर झाले तर डिझेलमध्ये 2.76 रुपयांची वाढ होऊन 95.96 रुपये लिटर भाव झाला.

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.