AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax: 12 लाखांचे उत्पन्न आयकर मुक्त, अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर नुकसान नव्हे सरकारला होणार असा फायदा?

Income Tax Information : राज्यांना आयकर सूटच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्यांच्या उत्पन्नात 28 हजार कोटींची वाढ होणार आहे. त्याचा सरळ फायदा एफएमसीजी, हेल्थकेयर, ऑटोमोबाइल आणि एंटरटेनमेंट सेक्टर्सला होणार आहे. या सेक्टर्समधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल एक टक्के वाढणार आहे.

Income Tax: 12 लाखांचे उत्पन्न आयकर मुक्त, अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर नुकसान नव्हे सरकारला होणार असा फायदा?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 15, 2025 | 9:03 AM
Share

Income Tax Information : केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना खूश करणारी मोठी घोषणा केली. नवीन करप्रणालीत आता 12 लाख रुपयेपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्यावर कोणताही कर लागणार नाही. यामुळे करदात्यांचे एकदात्यांचे वर्षाला एक लाख कोटी रुपये वाचणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. परंतु सामान्यांच्या खिशातील वाचलेल्या या पैशांमुळे बाजारात विक्री वाढणार आहे. त्याचा फायदा नॉन फूड प्रॉडक्ट्समध्ये तसेच ऑटो, एफएमजीसी, हेल्थकेयर, टेक्सटाइल सेक्टर आणि फूड प्रॉडक्ट्समधील प्रोसेस्ड फूड आणि बेवरेज इंडस्ट्रीला होणार आहे. तसेच सरकारला जीएसटीच्या माध्यमातून कमाई होणार आहे.

आयकर सूट देण्यामागे सरकारचा प्लॅन असा

एसबीआयचा रिपोर्टनुसार, आयकर सूट दिल्यानंतर अर्थव्यवस्थेस बूम येणार आहे. विक्रीत 3.3 लाख कोटींची वाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी वेगाने होतील. बाजारात पैसे येतील. बाजारात विक्री वाढणार असल्यामुळे सरकारला फायदा होणार आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये 40 हजार कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. मध्यमवर्गींयांना या योजनेचा फायदा होणार असताना सरकारला त्याचा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्यांना होणार फायदा

राज्यांना आयकर सूटच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्यांच्या उत्पन्नात 28 हजार कोटींची वाढ होणार आहे. त्याचा सरळ फायदा एफएमसीजी, हेल्थकेयर, ऑटोमोबाइल आणि एंटरटेनमेंट सेक्टर्सला होणार आहे. या सेक्टर्समधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल एक टक्के वाढणार आहे. त्यामुळे जीडीपी 0.6 टक्के वाढणार आहे.

कोणत्या सेक्टरला किती फायदा

रिपोर्टनुसार 1.99 लाख कोटी रुपये नॉन फूड प्रॉडक्ट्सवर तर 1.30 लाख कोटी रुपये फूड प्रॉडक्ट्सवर खर्च होणार आहे. खाद्य पदार्थांवर सर्वाधिक 37 हजार 257 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. वाहनांवर 28 हजार कोटी, ड्यूरेबल गुड्सवर 22 हजार कोटी, कपड्यांवर 16 हजार कोटी, फुटवेअरवर 2900 कोटी, मेडिकलवर 13 हजार कोटी रुपये, पान-गुटखावर 8 हजार कोटी, इंधन आणि लाईटवर 18 हजार कोटी, घरगुती सामानांवर 17 हजार कोटी, शिक्षणावर 19 हजार कोटी, कंज्यूमर आइटम्सवर 19 हजार कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत