
मागील आर्थिक वर्षात तुम्ही आयकर भरला असेल. आता नवीन आर्थिक वर्षातील गुंतवणुकीची कागदपत्रांची नोंद तुम्ही ठेवत असाल. आता इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आहे. आयटीआर भरण्याची अखेरची तारीख 31 जुलै 2025 ही आहे. पण वेळेअगोदर चुका टाळत तुम्ही दंड, टॅक्स नोटीस आणि रिफंडला लागणारा वेळ वाचवू शकता. ITR दाखल करणे म्हणजे केवळ एक अर्ज भरणे नाही. छोट्या छोट्या चुका सुद्धा महागात पडू शकतात. या चुका टाळल्या तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.
टाळा या चुका
योग्य ITR फॉर्म निवडा
आयकर विभागाने काही ITR फॉर्म निश्चित केले आहेत. तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार, सावधगिरीने आयटीआर फॉर्म निवडावा लागतो. नाहीतर अयोग्य फॉर्म नाकारल्या जाऊ शकतो. आयकरच्या कलम 139(5) अंतर्गत तुम्हाला रिव्हाईज्ड रिटर्न दाखल करण्यास सांगितल्या जाऊ शकते.
फॉर्म 26AS डाऊनलोड करा
फॉर्म 26AS हे टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट तुमच्या उत्पन्न आधारे टीडीएस पेमेंटी सर्व माहिती देते. तुम्हाला टॅक्स रिफंड क्लेम करण्यापूर्वी ते तपासून पाहा. करदात्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी Form 26AS आणि Form 16/16A याचा पडताळा घेण्यास सांगण्यात येऊ शकते. त्यामुळे तुम्ही योग्य टॅक्स रिटर्न फाईल करू शकाल.
उत्पन्नाची द्या योग्य माहिती
तुमच्या उत्पन्नाची योग्य माहिती द्या. जर तुम्ही मुद्दामहून अथवा चुकून काही लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याविषयीची माहिती मिळाल्यास आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते. बचत खात्यावरील व्याज आणि घर भाड्यातून होणारी कमाई याची माहिती द्यावी लागेल.
बँक खात्याची माहिती
अनेकदा लोक आयटीआर भरताना बँक खात्याची योग्य माहिती देण्यास विसरतात. त्यामुळे आयकर विभाग आयकर दात्यांना त्यांच्या बँक खात्याविषयीची सर्व माहिती देण्यास सांगू शकते.
टॅक्स स्लॅबची माहिती द्या
रिटर्न फाईलिंग करताना तुम्हाला तुमची कमाई आणि स्लॅबची योग्य माहिती देणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येता, त्या आधारावर आयटीआर फाईल करणे गरजेचा आहे. जुना आणि नवीन कर प्रणालीची माहिती सुद्धा असू द्या.
वैयक्तिक माहिती द्या
तुमची सर्व माहिती योग्य पद्धतीने आयटीआर फॉर्ममध्ये भरा. तुमच्या नावाचे स्पेलिंग, पूर्ण पत्ता, ई-मेल, संपर्क क्रमांक या सारखी माहिती, पॅन, आयटीआर आणि आधार यासारखी माहिती द्या. तर तुमचा मोबाईल क्रमांक न चुकवता नमूद करा. त्यामुळे त्याच्यावर एसएमएस आणि इतर माहिती मिळू शकेल.