आता पाक क्रिकेट बोर्डावर Operation Sindoor?; BCCI चा एक फैसला आणि PCB ला 220 कोटींचा फटका
PCB Operation Sindoor : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या मोठ्या पेचात अडकले आहे. BCCI चा एक निर्णय आणि पीसीबीला 220 कोटींचा फटका बसेल. त्यामुळे अनेक जण पीसीबीवर ऑपरेशन सिंदूर होणार असल्याचा दावा करत आहे. काय आहे हे प्रकरण?

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान तणाव कायम आहे. त्याचा परिणाम क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा दिसला आहे. दोन्ही देशातील क्रिकेट संघ आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कप यामध्ये एकमेकांविरोधात खेळत आहेत. त्यातच दोन्ही टीम हे या दोन्ही देशातील मैदानावर अद्याप समोरा समोर आलेल्या नाहीत. दोन्ही देशातील सामने इतर देशात खेळवण्यात आलेले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. त्यात भारताने पाकला धूळ चारली. ताज्या संघर्षानंतर आता आशिया कप 2025 (Asia Cup 2025) वर संकटाचे ढग जमा झाले आहेत. BCCI या सामन्यासाठी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सचिव देवजीत सौकिया यांनी दिली आहे. जर भारताने या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला नाही तर पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
BCCI च्या हातात पाकचे 220 कोटी
आशिया कप 2025 या वर्षी सप्टेंबर महिन्यात होत आहे. विशेष म्हणजे भारताकडे या टुर्नामेंटचे यजमानपद आहे. तर दुसरीकडे महिला इमर्जिंग टीम आशिया कप पुढील महिन्यात श्रीलंकेत आयोजीत करण्यात आला आहे. बीसीसीआय लवकरच या टुर्नामेंटविषयी मोठा निर्णय घेणार आहे. भारत-पाकिस्तान सामना हा जगभरात सर्वाधिक पाहिल्या जाणारा सामना आहे. त्यातून कोट्यवधींची कमाई होते. जर भारताने या कपातून माघार घेतली. तर पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठ्या महसूलाला मुकावे लागेल. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे पीसीबीचे जवळपास 165 ते 220 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारताशिवाय या टुर्नामेंटमध्ये कमाईची गणित मांडणे केवळ अशक्य आहे.
आयसीसीचे सामने दुबईत
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तानमधील सर्व सामने हे दुबईत खेळण्यात आले. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. तर भारत हा अंतिम सामन्यात पोहचल्यावर अखेरचा सामना पाकिस्तानात खेळवण्याचा अधिकार पण पाकिस्तानला मिळाला नव्हता. त्याचे यजमानपद केवळ नावालाच उरले होते.
काही वृत्तानुसार, भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जवळपास 700 कोटींचा फटका बसला होता. त्यामुळे जर आशिया कपातून भारताने माघारीचा निर्णय घेतला तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात सापडेल. त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच नाही तर इतर क्रिकेट मंडळांवर सुद्धा दिसून येईल. त्यांना पण आर्थिक भुर्दंड सहन कराव लागेल.
2023 मध्ये हायब्रीड मॉडेल
आशिया कप 2023 मध्ये सुद्धा भारत आणि पाकिस्तानच्या वादाची झालर दिसून आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचे यजमान पद स्वीकारले होते. पण भारताने पाकचा दौरा केला नव्हता. ही टूर्नामेंट हायब्रिड मॉडलवर खेळली गेली. टीम इंडियाने सर्व सामने श्रीलंकेत खेळले. तर अखेरचा सामना सुद्धा पाकिस्तानबाहेर झाला. त्याचा पाक बोर्डाच्या मिळकतीवर परिणाम झाला.
