ITR Form : फिरण्यावर किती पैसे खर्च केले? सुट्ट्यांमधील खर्चाचा हिशेब द्या, नवीन ITR फॉर्ममध्ये माहिती भरा

ITR Form Holidays Expenditure : फिरायला जात असाल तर आता ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, CBDT एक नवीन फॉर्म घेऊन येत आहे. त्यामध्ये पर्यटनावरील खर्चाची माहिती द्यावी लागणार आहे, काय आहे अपडेट?

ITR Form : फिरण्यावर किती पैसे खर्च केले? सुट्ट्यांमधील खर्चाचा हिशेब द्या, नवीन ITR फॉर्ममध्ये माहिती भरा
पर्यटनाचा मोह महागात पडणार
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 29, 2025 | 4:52 PM

जर तुम्ही सुट्ट्यांवर जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही या उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन, बाहेर देशात जाऊन एन्जॉय करणार असाल, खूप पैसा खर्च करणार असाल तर आता त्याची माहिती सरकारला द्यावी लागू शकते. ही माहिती आयकर रिटर्न (ITR) फाईल करताना द्यावी लागेल. सरकार त्यासाठी आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल करत असल्याची माहिती समोर येत आहे. जे लोक कमाईच्या नावाने रडतात आणि पर्यटनावर खर्च करतात, त्यांना हा नवीन बदल अडचणीचा ठरू शकतो. आलिशान जीवन जगणाऱ्यांना या नवीन बदलाची मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

इकोनॉमिक टाइम्सच्या एका वृत्तानुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, CBDT एक नवीन फॉर्म घेऊन येत आहे. लोक त्यांची कमाई कमी दाखवू नये आणि ज्यांची कमाई आणि जीवनशैलीवरचा खर्च अधिक आहे, त्यांची अचूक माहिती समोर यावी यासाठी हा बदल करण्यात येत असल्याचे कळते. नवीन ITR फॉर्ममध्ये सवलत आणि दिलासा काय हवा याविषयीची अधिक माहिती भरावी लागणार आहे. त्यामुळे काही लोक चुकीच्या पद्धतीने सूट, सवलत घेऊन त्यांची कमाई तर लपवत नाहीत ना, याची माहिती घेण्यासाठी हा बदल करण्यात येत असल्याचे कळते. या नवीन बदलाचा फटका सरकारी कर्मचार्‍यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केव्हा बदलणार आयटीआर फॉर्म?

या वृत्तात अधिकार्‍यांच्या आधारे, दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षापासून हा आयटीआर फॉर्म बदलेल. तर काही बदलांसह या मूल्यांकन वर्षापासूनच हा फॉर्म लागू होऊ शकतो. एका अधिकाऱ्याने सांगितले की, टॅक्स रिटर्न फॉर्म बदलण्याची गरज आहे. हा अर्ज भरण्यासाठी सोपा असेल. जे लोक त्यांची कमाई लपवत आहेत, कर चोरी करत आहेत, ते त्यांच्या व्यवहारांमुळे अडचणीत येतील. नवीन आयटीआर फॉर्मची माहिती लवकरच समोर येईल असा दावा करण्यात येत आहे.

नवीन आयकर बिल

या वर्षी 12 फेब्रुवारी रोजी नवीन आयकर बिलाची ड्राफ्ट कॉपी समोर आली होती. हा नवीन आयकर कायदा पहिल्यापेक्षा सुटसुटीत, सरळ आणि समजण्यास सोपा असेल. हा नवीन कायदा, अधिक स्पष्ट असेल. तर त्यातील किचकटता कमी होईल. कर प्रणाली अधिकाधिक करदाताभिमूक करण्यावर भर देण्यात येणार आहे.