IT Raid : अंडरवेअर कंपनीवर IT रेड! हे कारण आले पुढे

IT Raid : या अंडरवेअर कंपनीवर आयकर खात्याने धाड टाकली. या छापासत्राची माहिती शेअर बाजारात पोहचताच कंपनीच्या शेअरमध्ये धडामधूम झाले. कंपनीचा शेअर 4.55 टक्क्यांनी घसरला. सूत्रांच्या माहितीनुसार या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरु होती.

IT Raid : अंडरवेअर कंपनीवर IT रेड! हे कारण आले पुढे
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 4:52 PM

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : देशात अंडरवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण झाल्याची बातमी गेल्या आठवड्यात येऊन धडकली होती. अनेक कंपन्यांची विक्री घसरली आहे. कंपन्या या घसरणीने चिंतेत असतानाच आता अंडरवेअर उत्पादन करणाऱ्या या कंपनीवर प्राप्तीकर खात्याने छापा (IT Raid On Underwear Company) टाकला आहे. कंपनीच्या विविध ठिकाणच्या कार्यालयावर धाडसत्र सुरु होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घरावर सुद्धा छापा पडला. या दरम्यान कसून चौकशी करण्यात आली. या धाडसत्राची माहिती मिळताच शेअर बाजारात शेअर घसरला. कंपनीचा शेअर 4.55 टक्क्यांनी घसरला. या धाडीविषयी कंपनीने कोणतीही आधिकृत माहिती दिली नाही.

हे सुद्धा वाचा

कंपनीवर काय आरोप

200 कोटी रुपयांचा कर चोरी केल्याप्रकरणात प्राप्तिकर खात्याने लक्स इंडस्ट्रीज (Lux Industries) कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले. देशभरात ही कारवाई झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने कोलकत्तासह इतर अनेक शहरात कंपनीच्या कार्यालयावर धाड घातली. तसेच कंपनीच्या इतर ठिकाणी पण चौकशी सुरु आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर पण छापा टाकण्यात आला.

कंपनीचा शेअर घसरला

कंपनीच्या कार्यालयावर धाड पडल्याचे वृत्त शेअर बाजारात येऊन धडकले. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण आली. कंपनीचा शेअर 4.55 टक्क्यांनी घसरला. कंपनीचा शेअर 1451 रुपयांपर्यंत घसरला. BSE आकड्यानुसार लक्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 3.32 टक्के घसरण झाली. 1469.70 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. कंपनीचा शेअर सकाळच्या सत्रात 1510 रुपयांवर उघडला. तर एक दिवसापूर्वी हा शेअर 1520.20 रुपयांवर बंद झाला होता.

या कंपनीवर पण धाडसत्र

कानपूर येथे शूज तयार करणाऱ्या युरो फुटवेअर कंपनीवर पण धाड पडली. आयकर विभागाच्या टीमने येथे छापा टाकला. युरो फुटवेअर ही बुट तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी फुटवेअरमधील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी पादत्राणे निर्यात करते. देशातील अनेक ठिकाणी कंपनीचे ऑफिस आणि फॅक्टरी आहेत. दुपारी 2 वाजता आयकर विभागाने कंपनीच्या कार्यालयावर अचानक धाड टाकली. यावेळी पोलीस बंदोबस्त होता. कंपनीच्या इतर ठिकाणी पण धाडसत्र राबविण्यात आले. याविषयीची अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाही.

Non Stop LIVE Update
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.