AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Filing Due Date: आयटीआर वेळेवर भरला नाही तर किती दंड भरावा लागतो? वाचा नियम…

आयकर रिटर्न भरण्याची वेळ संपण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. जर तुम्ही 15 तारखेपर्यंत ITR भरू शकला नाहीत तर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ITR Filing Due Date: आयटीआर वेळेवर भरला नाही तर किती दंड भरावा लागतो? वाचा नियम...
income tax due date
| Updated on: Sep 14, 2025 | 5:39 PM
Share

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. रिटर्न भरण्याची वेळ संपण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. जर तुम्ही 15 तारखेपर्यंत ITR भरू शकला नाहीत तर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण 15 तारखेनंतर रिटर्न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने सर्व करदात्यांना त्यांचे ITR वेळेवर भरण्याचे आवाहन केले आहे. जर आयकर वेळेवर भरला नाही तर किती दंड भरावा लागेल ते जाणून घेऊयात.

उशिरा ITR भरल्यास किती दंड होणार?

आयकर विभागाने सांगितले आहे की, ITR भरला नाही किंवा वेळेवर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. आयकर कायद्याच्या कलम 234F नुसार, निर्धारित वेळेनंतर रिटर्न भरणाऱ्यांना दंड भरावा लागेल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला 1000 रुपये दंड भावा लागेल. तसेच 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. पूर्वी हा दंड 10 हजार रुपयांपर्यंत होता परंतु तो 5000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

15 सप्टेंबरनंतरही आयटीआर दाखल करता येणार

जे करदाते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचा आयटीआर दाखल करू शकणार नाहीत, त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. अस्सेसमेंट इयर संपण्याच्या तीन महिने आधी किंवा अस्सेसमेंट वर्ष संपण्यापूर्वी आयकर भरू शकता. मात्र यावेळी तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

आयकर लवकर भरणे फायदेशीर

आयकर रिटर्न वेळेवर भरणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते. वेळेवर रिटर्न भरून तुम्ही विविध सरकारी फायदे मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही आयकर रिटर्न भरला नसेल, तर पुढील काही तासांमध्ये तो भरा. कर वेळेवर भरल्याने तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

ऑनलाइन आयकर रिटर्न कसा भरायचा?

तुम्ही घरबसल्या एका तासात आयकर रिटर्न भरू शकता. सर्वप्रथम, https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login या वेबसाइटवर जा. इथे तुमचा पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. यासाठी आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. लॉग इन केल्यानंतर, ‘फाइल इन्कम टॅक्स रिटर्न’ वर क्लिक करा. पुढे एसेसमेंट वर्ष (2025-26 ) निवडा. नंतर तुमच्या उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म निवडा. सिस्टममध्ये तुमचा पगार, टीडीएस आणि बँक व्याज यासारखी माहिती आधीच भरलेली असेल ती नीट तपासा. जर त्यात काही दुरुस्ती आवश्यक असेल तर ती करा. यानंतर, तुमचा रिटर्न सबमिट करा. अशाप्रकारे अवघ्या काही मिनिटांमध्ये रिटर्न भरता येतो.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक