AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol Diesel Price : स्वस्तात कच्चा तेलाची रशियाकडून आयात, मग देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त कधी होणार, आजचा भाव काय?

Today Petrol Diesel Price : रशियाकडून कच्चा तेलाची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशात भारत अग्रेसर ठरला आहे. तेल आयातीत 384 टक्के वाढ झाली आहे. आता देशात इंधनाचे दर कधी कमी होतील?

Today Petrol Diesel Price : स्वस्तात कच्चा तेलाची रशियाकडून आयात, मग देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त कधी होणार, आजचा भाव काय?
आजचा दर काय
| Updated on: Feb 18, 2023 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली : भारताचे (India) रशियासोबतचा (Russia) व्यापर अधिक वाढला आहे. दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत झाले आहेत. दोन्ही देशात व्यावसायिक आणि व्यापारी संबंधात वाढ झाली आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघाची हरकत डावलून भारताने रशियाकडून कच्चा तेलाची (Crude Oil) आयात सुरुच ठेवली आहे. रशियासोबतच्या आयातीत 384 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालु आर्थिक वर्षात (FY22-23) गेल्या 10 वर्षांत भारत रशियाचा चौथा मोठा आयात करणारा देश झाला आहे. विशेष म्हणजे भारताला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळाले आहे. त्यामुळे देशात आता पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होतात, याकडे जनतेचे लक्ष लागेल आहे.

सध्या भारत जागतिक तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदीवर भर देत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. कोलंबिया, रशिया, लिबिया यासह छोट्या राष्ट्रांकडूनही भारताने इंधन आयात सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याची दाट शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर आज घसरले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाच्या भावात आज 2.51 टक्क्यांची घसरण झाली. हा भाव आज 83.00 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. तर डब्ल्यूटीआय कच्चा तेलाच्या किंमती ही 2.74 घसरल्या. हा भाव 76.34 डॉलर प्रति बॅरल झाला.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  3. अहमदनगर पेट्रोल 106.15 तर डिझेल 92.67 रुपये प्रति लिटर
  4. अकोल्यात पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  5. अमरावतीत 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  6. औरंगाबाद 107.85 पेट्रोल आणि डिझेल 94.31 रुपये प्रति लिटर
  7. नागपूरमध्ये पेट्रोल 106.41 तर डिझेल 92.95 रुपये प्रति लिटर
  8. नांदेडमध्ये पेट्रोल 108.37 तर डिझेल 94.83 रुपये प्रति लिटर
  9. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 92.92 रुपये प्रति लिटर
  10. नाशिकमध्ये पेट्रोल 106.48 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  11. लातूरमध्ये पेट्रोल 107.73 तर डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
  12. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.63 आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.03 आणि डिझेल 92.55 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.72 रुपये तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर आहे

Follow Us
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा