AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर भारत ठाम, डोनाल्ड ट्रम्पसह अनेक दिग्गजांना धक्का, आता नवीन ट्रेड वॉर सुरु होणार का?

भारत डेडलाइनच्या माध्यमातून कोणतीही ट्रेड डील करणार नाही. अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार पूर्णपणे अंतिम झाल्यावर पूर्ण केला जाणार आहे, असे केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर भारत ठाम, डोनाल्ड ट्रम्पसह अनेक दिग्गजांना धक्का, आता नवीन ट्रेड वॉर सुरु होणार का?
Updated on: Jul 05, 2025 | 11:56 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेड डीलसाठी दिलेली मुदत ९ जुलै रोजी संपणार आहे. ट्रेड डीलसाठी भारत आणि अमेरिका आपआपल्या अटींवर ठाम आहे. भारताने या ट्रेड डीलवर ठोस भूमिका घेतली आहे. या भूमिकेतून भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर संदेश दिला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका दरम्यान ट्रेड वॉर सुरु होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

करार पूर्ण झाल्यावरच होणार

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, भारत डेडलाइनच्या माध्यमातून कोणतीही ट्रेड डील करणार नाही. अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार पूर्णपणे अंतिम झाल्यावर पूर्ण केला जाणार आहे. हा करार राष्ट्रीय हिताचा असेल तरच तो स्वीकारला जाणार आहे. भारत युरोपियन युनियन, न्यूझीलंड, ओमान, अमेरिका, चिली आणि पेरूसह विविध देशांसोबत एफटीएसाठी वाटाघाटी करत आहे. अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित अंतरिम व्यापार कराराबद्दल विचारले असता, ते म्हणाले, एफटीए तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तो दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असणार आहे. राष्ट्रीय हित नेहमीच सर्वोपरी असले पाहिजे. हे लक्षात घेऊन जर करार झाला तर भारत विकसित देशांसोबत करार करण्यास नेहमीच तयार असतो.

करार कधी पूर्ण होणार?

अमेरिकासोबत अंतरिम व्यापार करार ९ जुलैपर्यंत पूर्ण होणार का? त्यावर बोलताना गोयल म्हणाले, भारत विशिष्ट डेडलाइनवर व्यापार करार करणार नाही. जेव्हा करार पूर्ण होईल आणि तो देशहिताचा असेल तेव्हाच स्वीकारण्यात येणार आहे. सध्या या कराराच्या चर्चेसाठी वॉशिंग्टनला जाण्याची कोणताही चर्चा नाही, असे पीयूष गोयल यांनी म्हटले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनासाठी २६ टक्के कर लावला होता. त्यानंतर ९० दिवसांसाठी हा निर्णय स्थगित केला. आता अमेरिका ९ जुलैपूर्वी व्यापारी करार पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. परंतु भारताकडून जोपर्यंत अंतिम स्वरुप होत नाही, तोपर्यंत करार होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या करारासाठी दोन्ही देशांकडून अधिकारी आणि मंत्री पातळीवर चर्चा झाली आहे.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO
मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO.
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा.
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान.
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.