Facebook : कर्माने मिळविली, Facebook ने हिसकावली, दोन दिवसांतच गमावली भारतीय तरुणाने नोकरी..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 10, 2022 | 9:30 PM

Facebook : स्वप्नांचा चुराडा होणे काय असते, याचे दुःख एका भारतीयाच्या बातमीतून समोर येईल..

Facebook : कर्माने मिळविली, Facebook ने हिसकावली, दोन दिवसांतच गमावली भारतीय तरुणाने नोकरी..
अवघ्या दोनच दिवसात गेली नोकरी
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : स्वप्नांचा चुराडा होणे काय असते, याचे दुःख एका भारतीयाच्या बातमीतून समोर आले आहे. अचानक टेक इंडस्ट्रीत (Tech Industry) कर्मचारी कपातीचा एकच धडाका सुरु आहे. ट्विटरनंतर Facebook ची मूळ कंपनी Meta ने ही कर्मचारी कपातीचा बॉम्ब फोडला आहे.

Facebook च्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याच्या निर्णयामुळे जवळपास 11 हजार लोकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. या कपातीत काही भारतीयांचा ही समावेश आहे.

कपातीनंतर कर्मचाऱ्यांवर काय परिस्थिती ओढावली आहे. याचे अनेक अनुभव कर्मचारी शेअर करत आहेत. त्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाच वापर होत आहे. त्यातून कर्मचाऱ्यांवर या कपातीचा किती गंभीर परिणाम झाला आहे, हे समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

या कर्मचाऱ्यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचे दुःखही समोर आले आहे. या कर्मचाऱ्याला फेसबुकने नोकरी दिली. कॅनाडाला पाठविले. पण अवघ्या दोन दिवसातच त्याचा आनंद हिरावला. नोकरी ज्वॉईन करुन दोन दिवस झाले असतानाच फेसबुकने त्याला नोकरीवरुन काढले.

फेसबुकने बाहेरचा रस्ता दाखविल्यावर या तरुणाने त्याच्यावर बितलेली परिस्थिती विषद केली. त्याचे दुःख त्याने लिंक्डइन या अॅपवर शेअर केले आहे. हा तरुण IIT Kharagpur मधील पदवीधर आहे.

NDTV च्या अहवालानुसार, हिमांसू वी नावाचा हा तरुण काही दिवसांपूर्वीच भारतावरुन कॅनाडा पोहचला होता. मेटा कंपनीने ज्वॉईनिंग करुन घेतल्यानवर अवघ्या 2 दिवसातच त्याला नोकरीवरुन काढले.

तरुणाने लिंक्डइनवर त्याची आपबित्ती मांडली. पोस्टमध्ये त्याने लिहिल्याप्रमाणे नोकरी सुरु केल्याच्या दोन दिवसांनीच त्याचा मेटामधील प्रवास थांबला. मेटाने अनेकांना नोकरीवरुन काढले आहे. त्यामुळे त्या सर्वांसाठी सध्या काळ कठीण आहे.

ट्विटर ताब्यात घेतल्यावर एलॉन मस्क यांनी एका झटक्यात जवळपास 50 कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. त्यांनी गेल्या शुक्रवारी अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. त्यानंतर मेटाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI