AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways : ट्रेनमधून सामान नेण्याबाबतचे नियम बदलले, आता या वस्तूंना मिळाली मंजूरी

Railway Luggage Rules : रेल्वेत प्रवास करताना अनेक पदार्थ सोबत नेण्यावर रेल्वेने बंदी घातलेली आहे. मात्र आता काही प्रकारच्या वस्तूंना रेल्वेत सोबत नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Indian Railways : ट्रेनमधून सामान नेण्याबाबतचे नियम बदलले, आता या वस्तूंना मिळाली मंजूरी
Indian Railways RuleImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 26, 2026 | 3:51 PM
Share

भारतात दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. हा प्रवास करताना प्रवाशांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. कारण रेल्वेत प्रवास करताना अनेक पदार्थ सोबत नेण्यावर रेल्वेने बंदी घातलेली आहे. याबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाऊ शकते तसेच दंडही आकारला जाऊ शकतो. मात्र आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य रेल्वेत घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करत मोठ्या आकाराच्या क्रीडा साहित्याला रेल्वेत नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्याला लागू होणार नाही. रेल्वे मंत्रालयाच्या परिपत्रकात मोठ्या आकाराचे आणि नाजूक क्रीडा साहित्य वाहून नेण्याबाबतचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.

कोणते क्रीडा साहित्य सोबत नेता येणार?

नवीन नियमांनुसार, भालाफेकीसाठी वापरला जाणारा भाला आणि इतर मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य मालवाहतूक शुल्क भरल्यानंतर रेल्वेत नेता येणार आहे. अशा क्रीडा साहित्याला ट्रेनच्या लगेज डब्यात प्राधान्याने जागा दिली जाणार आहे. जेणेकरून खेळाडूंना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, या क्रीडा साहित्यावर सामान्य सामानासाठी लागू असलेली वजन मर्यादा लागू होणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता खेळाडूंना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

या क्रीडा साहित्याला परवानगी नाही

नवीन नियमांमध्ये पोल व्हॉल्टसाठी वापरला जाणारा पोल समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्याची लांबी आणि तांत्रिक कारणांमुळे तो कोणत्याही प्रवासी डब्यात सुरक्षितपणे वाहून नेता येत नसल्याने त्याला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र इतर साहित्य सोबत घेऊन प्रवास करता येणार आहे.

ट्रेनमध्ये या वस्तू नेण्यास बंदी

रेल्वेच्या नियमांनुसार काही वस्तू ट्रेनमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा कोणतेही ज्वलनशील पदार्थ, फटाके, दारूगोळा किंवा स्फोटक साहित्य, गॅस सिलेंडर, शस्त्रे किंवा कोणत्याही प्रकारचे धोकादायक साहित्याचा समावेश आहे. या वस्तू ट्रेनमध्ये आढळल्यास रेल्वेकडून संबंधित प्रवाशाविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर दंडही आकारला जाऊ शकतो. त्यामुळे या वस्तू कधीही रेल्वे प्रवासात सोबत नेऊ नयेत.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत