यंदा सोने-चांदीची शेअर बाजाराला धोबीपछाड; गुंतवणूकदारांना असे केले मालामाल

Gold Silver - Share Market Return : शेअर बाजार म्हटलं की छप्परफाड कमाई हे गणित अनेकांच्या पथ्यावर पडतेच. पण यंदा शेअर बाजारापेक्षा सोने आणि चांदीने गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे केले आहेत. सोने आणि चांदीतील तुफान घौडदौडीचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.

यंदा सोने-चांदीची शेअर बाजाराला धोबीपछाड; गुंतवणूकदारांना असे केले मालामाल
परतावा सोन्यावाणी; शेअर बाजार पडला मागेImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 11:41 AM

वर्ष 2024 मध्ये केवळ शेअर बाजारानेच नाही तर सराफा बाजाराने पण इतिहास रचला आहे. दररोज नवनवीन रेकॉर्ड इतिहास जमा होत आहेत. तर नवीन विक्रम नावावर नोंदविण्याचे सत्र सुरु आहे. शेअर बाजार तेजीत असला की सोने आणि चांदीत पडझड होते, असा एक समज आहे. पण यंदा शेअर बाजारासोबतच सोने आणि चांदीने चौकर आणि षटकार ठोकले आहेत. मौल्यवान धातूंनी रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली आहे. या शर्यतीत सोने आणि चांदीने सेन्सेक्स आणि चांदीला पण धोबीपछाड दिली आहे. गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे.

असा दिला जोरदार परतावा

साल दर साल आधारावर परतावा पाहिला असता, यावर्षी सोन्याने गुंतवणूकदारांना 13 टक्क्यांचा परतावा दिल्याचे स्पष्ट होते. तर चांदीने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 8 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही दिवसांत मोठा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने 75,000 टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक NSE Nifty ने 4.65 टक्के तर BSE Sensex ने 3.83 टक्क्यांचा परतावा दिला आहे. बँक निफ्टी इंडेक्सने या वर्षात जवळपास 1.56 टक्क्यांची उसळी घेतली आहे. साल दर साल या आधारावर सोने आणि चांदीने शेअर बाजाराला मागे टाकल्याचे स्पष्ट होते.

हे सुद्धा वाचा

या तेजीचे कारण तरी काय

  1. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपातीचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी सोने आणि चांदीची खरेदी सुरु केली आहे. जागतिक स्तरावर सोने आणि चांदीची आयात वाढली आहे.
  2. जगात सध्या भू-राजकीय तणाव वाढला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात दोन वर्षांहून अधिका काळापासून युद्ध सुरु आहे. तर इकडे इस्त्राईल आणि हमास या दोघांमध्ये जोरदार धुमश्चकी सुरु आहे. त्यामुळे सराफा बाजारात सोने आणि चांदी तळपले आहेत.
  3. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे अवमूल्यन हे पण एक प्रमुख कारण आहे. गेल्या 10 वर्षांत रुपयाची स्थिती खालावली आहे. पूर्वी डॉलर-रुपयाचे प्रमाण 64-67 रुपये असे होते. आता एका डॉलरसाठी 83.37 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे भारतीय रुपयात जागतिक बाजारातून सोने-चांदी खरेदी महाग होते.

सोने का चमकत आहे

पेस 360 चे सहसंस्थापक अमित गोयल यांच्या मते, भारतीय शेअर बाजाराने गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपासून पूर्ण मौसमात आहे. त्याची घौडदौड कायम आहे. मार्च ते डिसेंबर 2023 या काळात सोने आणि चांदी पूर्णपणे बाजूला होते. पण आता या धातूंनी मोठी झेप घेतली आहे. त्यामुळेच ते सेन्सेक्सपेक्षा जोरदार कामगिरी बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...