पैसा कमावण्यासाठी या देशात भारतीयांची धाव; मालामाल होऊनच येतात परत, पण कसे?

Indian Worker : कमाई करण्यासाठी या देशात भारतीय कामगार मोठ्या संख्येने जातात आणि कमाई करून भारतात परतात. अथवा तिथून मोठ्या प्रमाणात पैसा भारतात पाठवतात. कोणता आहे हा देश?

पैसा कमावण्यासाठी या देशात भारतीयांची धाव; मालामाल होऊनच येतात परत, पण कसे?
कमाईच कमाई
| Updated on: Oct 03, 2025 | 2:33 PM

रोजगारासाठी लाखो भारतीय आखाती देशात जातात. तिथे त्यांची जबरदस्त कमाई होते. त्यामागे एक कारण आहे. चलन विनिमय दराच्या फरकामुळे भारतीय कामगार तिथे जाऊन श्रीमंत होतो. कारण आखाती देशातील काही चलनाची किंमत भारतीय रुपयांपेक्षा अधिक आहे. सौदी अरबच्या व्हाईसडॉटकॉम या संकेतस्थळानुसार, सध्या 1 सौदी रियालची (Saudi Arab Riyal) किंमत 23.66 भारतीय रुपये इतकी आहे.

म्हणजे जर एखाद्या भारतीयाने अखाती देशात जाऊन एक लाख सौदी रिआलची कमाई केली तर भारतीय चलनात त्याचे मूल्य जवळपास 23 लाख 66 हजार 493 रुपये इतके होईल. याउलट भारतीय व्यक्ती एक लाख रुपये घेऊन सौदी गेला तर तिथल्या चलनात जवळपास 4,224 रियाल मिळेल. या फरकामुळेच भारतीय कामगार सौदी अरबमध्ये जाऊन कमाई करण्याचे स्वप्न बाळगतात. त्यासाठी मोठी जोखीम घेतात. कुटुंबापासून दूर जातात.

भारतीय कामगार आणि सौदी अरब

सौदी अरब हा भारतीय, बांगलादेशी आणि पाकिस्तानातील नागरिकांसाठी रोजगाराचे मुख्य केंद्र आहे. प्रत्येक वर्षी भारतीय सौदी अरबमध्ये जातात. ते तिथे खास करून तेल-गॅसशी संबंधिक उद्योग, घरगुती काम आणि सेवा उद्योगात काम करतात. तसेच इतर ठिकाणीही ते काम करतात. त्यातून त्यांची मोठी कमाई होते. दोन्ही चलनातील फरकामुळे त्यांना फायदा होतो.

सौदी अरब आर्थिक शक्ती

सौदी अरब उंच मनोरे, काचेच्या गगनचुंबी इमारती, येथील श्रीमंत शेखांची आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. या देशात तेलाचे साठे आहेत. त्याच्या निर्यातीमुळे हा देश सुखवस्तू आणि श्रीमंत, समृद्ध झाला आहे. येथील समाज आर्थिक आणि पायाभूत सुविधांमुळे आघाडीवर आहे. येथे पर्यटन व्यवसाय फुलला आहे. त्यातूनही मोठा रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. विकासाची मोठ-मोठी कामे होत आहेत.

भारत आणि सौदी अरबमधील संबंध

भारत आणि सौदी अरबमध्ये चांगले संबंध आहेत. पाकिस्तानसोबत लष्करी करार केल्यानंतर दोन्ही देशात एक कटुता आली आहे. पण हा राजकीय मुद्दा आहे. यामागे अमेरिका असल्याचे म्हटले जाते. हा मुद्दा लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तर भारतीय पर्यटकांची सौदी अरबमधील संख्या सर्वाधिक आहे. दोन्ही देशात अनेक वर्षांपासूनचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत.