नारायण मूर्ती यांच्या 17 महिन्यांच्या नातवाला लॉटरी; कमावले 3.3 कोटी, पण कशी जमली ही खेळी

Narayan Murthy Grandson Ekagra : Infosys चे सह संस्थापक नारायण मूर्ती यांचा 17 महिन्यांचा नातू आता कोट्याधीश झाला आहे. त्यांच्या नातावाने 3.3 कोटी रुपये कमावले आहे. पण ही कमाई झाली कशी? तुम्हाला माहिती आहे का?

नारायण मूर्ती यांच्या 17 महिन्यांच्या नातवाला लॉटरी; कमावले 3.3 कोटी, पण कशी जमली ही खेळी
नातावाला लागली लॉटरी, झाला कोट्याधीश
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 18, 2025 | 4:30 PM

Infosys Dividend 2025 : एक 17 महिन्यांचा मुलगा कोट्याधीश कसा होऊ शकतो? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण जर आजोबा आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपनीचे सहसंस्थापक असतील तर असा चमात्कार होणे अवघड नाही. गुंतवणुकीचे शास्त्र माहिती असणार्‍या कुणालाही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ति यांच्या 17 महिन्याच्या नातवाने आतापर्यंत कंपनीकडून 10.65 कोटी रुपयांचा डिव्हिडंड कमावला आहे. या आयटी कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी 22 रुपये प्रति शेअर असा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या नातवाला यावेळी 3.3 कोटींचा लाभांश मिळाला आहे.

केव्हा मिळेल लाभांश?

IT कंपनीने 22 रुपये प्रति शेअरचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. तर त्यांच्या नातावाच्या नावाने कंपनीत 15 लाखांचे शेअर आहेत. कंपनीच्या एकूण शेअरमध्ये हा वाटा 0.04 टक्के इतका आहे. लाभांश प्राप्तीसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट 30 मे निश्चित केली आहे. तर 30 जून रोजी लाभांश रक्कम शेअर धारकाच्या डीमॅट खात्यावर जमा होईल.

लाभांशातून आतापर्यंत इतकी कमाई

Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ति यांच्या नातवाने यापूर्वी तीनदा लाभांशातून एकूण 7.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या अंतरिम लाभांशाची रक्कम मिळून त्यांची एकूण कमाई 10.65 कोटी रुपये इतकी झाली आहे. इतकेच नाही तर एकाग्र हा 1 वर्ष 5 महिन्यातच, सर्वात कमी वयातील कोट्याधीश झाला आहे.

कोणी दिले शेअर

इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी त्यांचा नातू एकाग्र याला 240 कोटी रुपये मूल्याचे 15 लाख शेअर भेट म्हणून दिले. एकाग्र हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णना यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 10 नोव्हेंबर 2023 रोजी बंगळुरुत झाला होता. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी अक्षता ही ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सोनक यांची पत्नी आहे. अक्षता मूर्ती हिला दोन मुली आहेत. या शेअर गिफ्टमुळे नारायण मूर्ती यांची कंपनीतील हिस्सेदारी 0.40% कमी होऊन 0.36 % इतकी राहिली आहे. कंपनीने मार्च महिन्यातील तिमाहीत 40,925 कोटी रुपयांचा महसूल जमवला. तो गेल्या तिमाहीपेक्षा 2 टक्क्यांनी कमी आहे.