Investment in gold : सोनं स्वस्त होतय; सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

सोन्याचा दर (Gold rates) 50 हजार रुपयांहून कमी झालाय. त्यामुळे सोनं खरेदी करावं का? की आणखीन दर कमी होणार आहेत, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. जाणून घेऊयात तज्ज्ञांचं मत.

Investment in gold :  सोनं स्वस्त होतय; सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 4:11 PM

सोन्याचा दर (Gold rates) 50 हजार रुपयांहून कमी झालाय. त्यामुळे सोनं खरेदी करावं का? की आणखीन दर कमी होणार आहेत, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेत (America) व्याज दरात वाढ होत असल्यानं अमेरिकन डॉलर सतत मजबूत होत आहे. मंदी आणि महागाईमुळे (inflation) गुंतवणूक सोन्याकडे वळणं अपेक्षित होती ती गुंतवणूक आता डॉलरकडे वळत आहे. त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे आणि डॉलरच्या तुलनेत सोनं कमजोर होत आहे. डॉलरमुळे सध्या सोन्याचे दर घसरत आहेत. याच कारणांमुळे जगभरातील बहुतांश गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंड्स सोनं विकत आहेत. जुलैच्या अखेरपर्यंत जगभरातील गोल्ड एक्सचेंज ट्रेडेट फंड्सकडे एकूण 3 हजार 708 टन सोनं होतं. त्यात आता घट होऊन 3 हजार 663 टन एवढं सोनं राहिलं आहे.

व्याज दरवाढीचा परिणाम

अमेरिकेत व्याज दरात वाढ झाल्यानं डॉलर उसळलाय. डॉलर इंडेक्स 20 वर्षांच्या सर्वोच्च स्थरावर म्हणजेच 110 च्या जवळपास पोहोचलाय. वाढत असलेले डॉलरचे दरच सोन्याचे भाव पाडत आहेत. सध्या देशांतर्गत आणि परदेशी बाजारात सोन्याचे दर सहा आठवड्याच्या निचांकी स्तरावर पोहोचलेत. जागतिक बाजारात प्रति औस सोन्याचा दर 1,700 डॉलरच्या खाली घसरला आहे. देशांतर्गत बाजारातही MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार रुपयांच्या खाली आलाय.

जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही तोपर्यंत व्याज दरात वाढ होतच राहणार, अशी स्पष्ट माहिती अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं दिलीये. व्याज दरात वाढ झाल्यास डॉलरही मजबूत होणार. अमेरिकेत कर्ज महाग झाल्यानं जगभरातील इतर मध्यवर्ती बँकांनीही व्याज दरात वाढ सुरू केलीये. त्यामुळे त्या देशातील कर्ज महाग होऊन चलन मजबूत होणार आहे.

हे सुद्धा वाचा

युरोपातील बँकाही व्याज दर वाढवणार

आता तर युरोपातील मध्यवर्ती बँकाही व्याज दरात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. असं झाल्यास डॉलरच्या तुलनेत युरो मजबूत होणार.त्यावेळी डॉलरकडे वळालेली गुंतवणूक पुन्हा सोन्यात वळू शकते त्यामुळे सोन्याच्या दराला सपोर्ट मिळू शकतो.

तज्ज्ञ काय म्हणतात?

या महिन्यातच युरोपातील मध्यवर्ती बँका व्याज दरात वाढू करू शकतात अशी माहिती तज्ज्ञांकडून प्राप्त होत आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. ईसीबीनं व्याज दरात वाढ केल्यास सोन्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, अशा परिस्थितीत डिसेंबरपर्यंत सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजेच पुन्हा एकदा सोन्याचा दर 52,500 रुपयांवर पोहचू शकतो,अशी माहिती केडिया अॅडवायझरीचे संचालक अजय केडिया यांनी दिलीये. मात्र सोन्याचे सध्याचे दर पाहून तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताल तर गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.