Small Cap Share : अरे षटकारच! एकाच वर्षात गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले, म्युच्युअल फंड पण झाले फिदा

Small Cap Share : एका वर्षात बीएसई निर्देशांकात 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर निफ्टी 50 मध्ये 11.65 टक्के वाढ दिसून आली. पण या काळात Nifty Smallcap 100-TRI जवळपास तिथेच अडकला. पण काही स्मॉल कॅप स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.

Small Cap Share : अरे षटकारच! एकाच वर्षात गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले, म्युच्युअल फंड पण झाले फिदा
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 7:36 PM

नवी दिल्ली : एका वर्षात बीएसई निर्देशांकात (BSE Index) 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर निफ्टी 50 मध्ये 11.65 टक्के वाढ दिसून आली. पण या काळात Nifty Smallcap 100-TRI जवळपास तिथेच अडकला. पण काही स्मॉल कॅप स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. यामधील या 6 छोटा पॅकेटसनी जोरदार धमाका केला. त्यांनी एका वर्षात जोरदार परतावा दिला. या शेअर्सवर म्युच्युअल फंडांनी (Mutual Fund) सुद्धा मोठा विश्वास ठेवला. त्यामुळे पडत्या काळात ही गुंतवणूकदारांना शिगोशिग फायदा घेता आला. शेअर बाजारात असे काही स्टॉक अनपेक्षित परतावा देतात. त्यामुळे गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले होते.

या स्टॉकमध्ये पॉवर मॅक प्रोजेक्टसने (Power Mech Projects) गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. या शेअरने एनएसईवर एका वर्षात 178 टक्क्यांची लंबी उडी मारली. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 859 रुपये होती. पण आता हा शेअर 2,394 रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरमध्ये एचएसबीसी, बिझनेस सायकल, एचडीएफसी स्मॉल कॅप आणि एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर यांनी गुंतवणूक केली आहे.

एलकॉन इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने (Elecon Engineering Company) एका वर्षातच गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळवून दिला. या शेअरने वर्षभरातच 162 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत केवळ 147.40 रुपये होती. आता हा शेअर एनएसईवर 386.85 रुपयांवर खेळत आहे. एलआयसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप, एलआयसी म्युच्युअल फंड चिल्ड्रेन्स गिफ्ट आणि एचडीएफसी मल्टी कॅपने या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

हे सुद्धा वाचा

अपोलो माइक्रो सिस्टम्स (Apollo Micro Systems) या यादीतील अजून एक स्मार्ट प्लेअर आहे. एका वर्षातच हा स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने जोरदार परतावा दिला आहे. या शेअरमध्ये एका वर्षातच 158 टक्क्यांची वाढ झाली आहे. रामा स्‍टील ट्यूब्‍स (Rama Steel Tubes) हा शेअरही असाच सूसाट आहे. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 148 टक्क्यांचा परतावा दिला आहे. वर्षभरात हा शेअर 12.71 रुपयांहून 32 रुपयांवर पोहचला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडने या दोन्ही शेअरमध्ये पैसा लावला आहे.

किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीच्या (Kirloskar Oil Engines) शेअरने एका वर्षात मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत. हा शेअर ही जोरदार चमकला आहे. एका वर्षात या शेअरने 155 टक्क्यांची उसळी घेतली आहे. आता हा शेअर 321.90 रुपयांवर पोहचला आहे. फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज, महिंद्रा मॅनुलाईफ मल्टी कॅप आणि आयडीबीआय स्मॉल कॅप सहित 25 म्युच्युअल फंड हाऊसनी या शेअरवर विश्वास दाखवला आहे.

सफारी इंडस्‍ट्रीजने (Safari Industries) गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्मॉल कॅप शेअरने एका वर्षातच गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 141 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी शेअरचा भाव 855.20 रुपये होता. आता या स्टॉकची किंमत 2,061 रुपये झाली आहे. सुंदरम कंजम्पशन, युनियन स्मॉल कॅप आणि डीएसपी स्मॉल कॅप सहित 12 म्युच्युअल फंड्सनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.

Disclaimer: हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. स्टॉक ब्रोकरेज हाऊसच्या आकडेवारीवरुन त्या शेअर्सची कामगिरी विषद करण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तुमचा अभ्यास आणि बाजारातील तज्ज्ञांचे मत जरुर घ्या.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.