रिलायन्स करणार कमाल, शेअरमध्ये तेजीचे सत्र, तज्ज्ञांना का वाटतोय विश्वास

Reliance Share | रिलायन्स शेअर कमाल करण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरणीचे सत्र सुरु आहे. त्यात ही रिलायन्स कंपनीच्या तिमाही निकालामुळे गुंतवणूकदारांच्या आशा वाढल्या आहेत. गुंतवणूकदारच नाही तर बाजारातील तज्ज्ञांना पण हा शेअर कमाल करणार असे वाटत आहे.

रिलायन्स करणार कमाल, शेअरमध्ये तेजीचे सत्र, तज्ज्ञांना का वाटतोय विश्वास
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 10:33 AM

नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरु आहे. बाजार गडगडला आहे. गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. काहींनी कॉल घेऊन ठेवला आहे तर काहींनी पुट घेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला कमाईची संधी मिळवायची आहे. जागतिक घडामोड, पटलावरील दोन युद्ध यामुळे बाजारातील भावना तीव्र आहे. कमाईच्या नादात शेअर बाजारात विक्री जोरात सुरु आहे. पण अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना रिलायन्स भरवशाचा शेअर वाटत आहे. रिलायन्सच्या तिमाही निकाल शुक्रवारी हाती आला. गुंतवणूकदारच नाही तर तज्ज्ञांचा पण या शेअरवरील विश्वास वाढला आहे.

असा वाढला नफा

रिलायन्स इंडस्ट्रीजची (RIL) उपकंपनी रिलायन्स रिटेलने शुक्रवारी आर्थिक वर्ष 2023-24 मधील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 2,790 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला वार्षिक आधारावर 21 टक्क्यांचा फायदा झाला. वार्षिक आधारावर रिलायन्स रिटेलच्या महसूलात वाढ होऊन तो 77,163 रुपये झाला. गेल्या वर्षात याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 64,936 कोटी रुपये होता.

हे सुद्धा वाचा

EBITDA मध्ये झाली वाढ

कंपनीच्या EBITDA मध्ये आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत वाढ झाली. आर्थिक वर्ष 23-24 च्या दुसऱ्या तिमाहीत रिलायन्स रिटेलचा EBITDA वार्षिक आधारावर 5,831 कोटींवर पोहचला. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 4,414 कोटी रुपये होता. तिमाही आधारावर कंपनीच्या EBITDA मध्ये उसळी दिसून आली. गेल्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 5,151 कोटी रुपये होता.

बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज काय

रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या सर्वच सेगमेंटमध्ये आणि सर्वच व्यवसायात मोठी वृद्धी नोंदवल्याचे मत बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. त्याचा फायदा शेअर बाजारात दिसेल. रिलायन्सचे शेअर वधारतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिलायन्सचे शेअर्स 2,300 ते 2,350 च्या स्तरावर पोहचतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर 2,210 रुपयांवर हा शेअर कमाल करु शकतो. तो आगेकूच करु शकतो, असा अंदाज आहे. तर अगदी कमी कालावधीत हा शेअर 2,500 रुपयांचा स्तर गाठेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रिलायन्स शेअरमध्ये 1.78 टक्क्यांची वाढ दिसून आली. हा शेअर 2,266 रुपयांवर काल व्यापार करत होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.