AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना संकटातही ‘या’ सरकारी योजनेला तुफान प्रतिसाद, गुंतवणूकदारांचा आकडा 3 कोटींवर

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात तब्बल 79 लाख नवे गुंतवणूकदार या योजनेअंतर्गत जोडले गेले.

कोरोना संकटातही 'या' सरकारी योजनेला तुफान प्रतिसाद, गुंतवणूकदारांचा आकडा 3 कोटींवर
सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार थकबाकीचा लाभ
| Updated on: Apr 23, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई : अटल पेन्शन योजनेला (Atal Pension Yojana) भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 पर्यंत या योजनेतील गुंतवणूकदारांची संख्या जवळपास 3 कोटींवर गेली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात तब्बल 79 लाख नवे गुंतवणूकदार या योजनेअंतर्गत जोडले गेले. सध्या अटल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 3.02 कोटी इतकी झाली आहे. मे 2015 मध्ये ही योजना सुरु झाली होती. दरम्यान, या योजनेत 70 टक्के खाती सार्वजनिक बँकांची तर 19 टक्के खाती ग्रामीण बँकांची आहेत.

6 महिन्यात 50 लाख नवे सबस्क्रायबर्स

गेल्या 6 महिन्यात या योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सहा महिन्यातच या योजनेतील गुंतवणूकदारांची संख्या 2.5 वरुन 3 कोटीपर्यंत पोहोचली.

गेल्यावर्षी या योजनेत 79.14 लाख नव्या गुंतवणूकदारांचा समावेश झाला. यामध्ये 28 टक्के म्हणजेच 22.07 लाख एकटे स्टेट बँकेचे (SBI) होते. तर कॅनरा बँकेने (Canara Bank) 5.89 लाख आणि इंडियन बँकेने (Indian Bank) 5.17 लाख गुंतवणूकदारांनी या योजनेअंतर्गत गुंतवणूक केली.

याशिवा बँक ऑफ बड़ौदा (Bank of Baroda), एयरटेल पेमेंट बँक (Airtel Payment Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), पंजाब नेशनल बँक (Punjab National Bank), युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India), इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank), एक्सिस बँक (Axis Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आर्यवर्त बँक (Aryavart Bank) आणि बडोदा यूपी बँक (Baroda UP Bank ) यांनी 1 ते 5 लाख नवी खाती उघडली.

कोणत्या राज्यात किती खाती? 

अटल पेन्शन योजनेला प्रत्येक राज्यात प्रतिसाद मिळत आहे. उत्तर प्रदेश यामध्ये अव्वल आहे. यूपीमध्ये 45.4 लाख जणांनी या योजनेत गुंतवणूक केली. त्यानंतर बिहारमध्ये 28.22 लाख, पश्चिम बंगालमध्ये 23.92 लाख, महाराष्ट्रात 23.17 लाख आणि तमिलनाडूमध्ये 22.57 लाख खाती याअंतर्गत उघडण्यात आली.

1 हजार रुपये पेन्शन

मागील सहा वर्षात 1 हजार प्रतिमहिना पेन्शनला प्राथमिकता मिळत आहे. जवळपास 77 टक्के लोकांनी 1 हजार रुपये महिना पेन्शन हाच पर्याय स्वीकारला आहे.

प्रत्येक महिन्याला पेन्शन गॅरंटी

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार 1 हजार ते 5 हजार रुपये महिना पेन्शन गॅरंटी देते. या योजनेतील प्लान 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शननुसार देण्यात येतात. यामध्ये महिन्याला 1,2,3,4 आणि 5 हजार असे प्लान आहेत. जर तुम्हाला महिन्याला 1 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर त्यानुसार तुम्हाला गुंतवणूक करावी लागते. त्याचप्रमाणे जर पाच हजार पेन्शन हवी असेल तर गुंतवणुकीचा आकडाही वाढतो.

संबंधित बातम्या  

Gold Price Today | डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर…

(Investors response to Atal Pension Yojana subscribes number crosses 3 crore APY)

मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.